घरक्रीडानाशिकमध्ये बास्केटबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

नाशिकमध्ये बास्केटबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

Subscribe

आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक अलेक्सझांडर स्टर्लिंग यांच्यामार्फत बास्केटबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजित करण्यात आले होते . भारतात सन २०२० ला जागतिक शालेय बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन छत्तीसगड येथे करण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक अलेक्सझांडर स्टर्लिंग यांच्यामार्फत बास्केटबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजित करण्यात आले होते . भारतात सन २०२० ला जागतिक शालेय बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन छत्तीसगड येथे करण्यात येणार आहे. याच्या तयारीसाठी भारताच्या खेळ प्राधिकरणांच्या वतीने भारताचा संघ दर्जदार व्हावा यासाठी खेळाडूंना जगातील सर्वोर्त्कृष्ट खेळाडू तथा प्रशिक्षक यांच्या मार्फत इंटेन्सिव्ह बास्केटबाँल शिबीर आयोजित करून प्रशिक्षण देण्याचे काम केले जात आहे. या अंतर्गत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे खेळाडू तथा प्रशिक्षक अलेक्सझांडर स्टर्लिंग यांना भारतात पाचारण करण्यात आले आहे. दिनांक १४ ते १८ नोव्हेंबर, २०१८ दरम्यान हे शिबीर आयोजित करण्यात आले.

१२७ खेळाडूंनी घेतला भाग

या संधीचा फायदा उचलून नाशिक जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन, आणि ऍपेक्स अकॅडमी यांच्या वतीने आणि नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि बॉईज टाऊन पब्लिक स्कुल यांच्या सहकार्याने अलेक्सझांडर स्टर्लिंग यांना नाशिकमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण करण्यात आहे होते. या शिबीराचे आयोजन दिनांक १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान नाशिकच्या बॉईज टाऊन पब्लिक स्कुल येथे करण्यात आले होते. या शिबीरामध्ये नाशिकमधील विविध शाळा, महिविद्यालाचे तसेच यशवंत व्यायाम शाळा, गोल्फ क्लब, यु. एस. जिमखाना, नाशिक रोड विविध बास्केटबॉल प्रक्षिशण केंद्राच्या १२७ मुलांनी आणि मुलीनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला.

- Advertisement -

खेळातले बारकावे शिकवले

या शिबीरामध्ये अलेक्सझांडर स्टर्लिंग यांनी वेगवेगळे गट करून खेळाडूंना बास्केटबॉलचे वेगवेगळे बारकावे शिकवले. त्यासाठी स्टर्लिंग यांनी प्रत्यक्ष स्वतः खेळून दाखविले आणि खेळाडूंकडून तसा सराव करून घेतला. तसेच खेळाच्या कौशल्याबरोबर आहार कसा असावा याच्याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अलेक्सझांडर स्टर्लिंग यांनी नाशिकच्या बास्केटबॉल प्रशिक्षकांनाही खेळाडूंकडून कशा प्रकारे सराव करून घ्यावा याच्या टिप्स दिल्या.

या शिबीरात स्टर्लिंग यांना बास्केटबॉलचे राज्य क्रीडा मार्गदर्शक राजेश क्षत्रिय यांनीही प्रशिक्षणात सहकार्य केले. यावेळी स्टर्लिंग यांनी सांगितले की भारतात बास्केटबॉलचे चांगले टॅलेन्ट आहे. त्यामुळे येथील प्रशिक्षकानी आपल्या खेळाडूंकडून योग्य सराव करून घेतल्यास या खेळाडूंना चांगली संधी मिळेल असे सांगितले. यासाठी मी वेळोवळी भारतातील अशा प्रशिक्षण केंद्राशी संपर्कात राहून त्यांची प्रगती कशी आहे याचा आढावा घेणार आहे असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -