घरक्रीडाऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० साठी भारतीय संघ जाहीर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० साठी भारतीय संघ जाहीर

Subscribe

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १२ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघामध्ये तीन फास्ट बॉलरसह हा संघ ऑस्ट्रेलियाविरोधात सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुध्द भारताच्या ट्वेंटी २० मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आज बीसीसीआयने १२ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १२ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघामध्ये तीन फास्ट बॉलरसह हा संघ ऑस्ट्रेलियाविरोधात सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. येत्या बुधवारी गॅबा येथे हा सामना होणार आहे.

- Advertisement -

रिषभ पंतला संधी

बीसीसीआयने बुधवारी होणाऱ्या या सामन्यासाठी १२ जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात विकेटकिपर म्हणून रिषभ पंत याला संधी मिळाली आहे. तसंच दिनेश कार्तिकलाही संघात संधी मिळाली आहे. कृणाल पांड्या, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या स्पिनरना संधी मिळाली आहे. २०१६ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळवला होता.

- Advertisement -

असा आहे भारतीय संघ

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, के.एल राहुल, पंत, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि चहल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -