घरक्रीडामॅच फिक्सिंगमध्ये रॉबीन मॉरिस गोत्यात, बीसीसीआय कारवाई करणार का?

मॅच फिक्सिंगमध्ये रॉबीन मॉरिस गोत्यात, बीसीसीआय कारवाई करणार का?

Subscribe

भारताशी संबंधित तीन मॅचच्या पिचशी कथित ढवळाढवळा केल्याच्या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. याप्रकरणी बीसीसीआयने माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिसविरुद्ध सावध प्रतिक्रिया दिली आहे. रॉबिन मॉरिस आयसीसीच्या कारवाईमध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर आम्हीही कारवाई करू असे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले आहे.

अल जजिरा वृत्तवाहिनी केले होते स्टिंग
अल जजीरा या चॅनलने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारत-श्रीलंकेमध्ये २६-२९ जुलै २०१७ साली गेल मैदानात झालेली टेस्ट, भारत-ऑस्ट्रेलियामध्ये रांचीत १६-२० मार्च २०१७ साली झालेली टेस्ट आणि भारत-इंग्लंडमध्ये चेन्नईत १६-२० डिसेंबर २०१६ साली झालेल्या टेस्टचा समावेश आहे. गेल आणि चेन्नईत झालेल्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता तर रांचीमध्ये झालेली मॅच ड्रॉ झाली होती.

- Advertisement -

कोण आहे रॉहिन मॉरिस?
रॉबिन मॉरिसने ४२ प्रथम श्रेणीत आणि ५१ लिस्ट ए मॅच खेळल्या आहेत. रॉबिन मॉरिस हा सध्या बीसीसीआयच्या कोणत्याही पदावर नाही. त्यामुळे त्याला कोणत्याही पदावरून हटवू शकत नाही. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेट खेळणाèया खेळाडूंना महिन्याला २२,५०० रुपये पेन्शन देते. रॉबिन मॉरिस याप्रकरणी दोषी आढळला तर त्याची पेन्शन रद्द करू असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. रॉबिन मॉरिसने हे सगळे आरोप फेटाळून लावले असून आपल्याविरुद्ध हे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

काय आहे स्टिंग ऑपरेशनमध्ये?
अल जजीराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रॉबिन मॉरिस पत्रकाराला गेल मैदानाचा पिच क्युरेटर थरंगा इंडिकाची भेट घालून देतो. या भेटीमध्ये क्युरेटर थरंगा इंडिका पिचमध्ये बदल करण्याचा दावाही करतो. रॉबिन मॉरिसला या व्हिडिओमध्ये कथित स्वरुपात पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन रजाबरोबर दाखवण्यात आले आहे. हसन रजा हा सगळ्यात लहान वयात टेस्ट क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटू आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याचा संपर्क आणि मैदानातल्या कर्मचाऱ्यांबरोबर पिच फिक्स करण्याच्या आपल्या क्षमतेबद्दल सांगत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -