घरक्रीडाशहिद जवानांच्या कुटुंबीयांना बसीसीआयचा मदतीचा हात

शहिद जवानांच्या कुटुंबीयांना बसीसीआयचा मदतीचा हात

Subscribe

काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना २० कोटींची आर्थीक मदत करण्याचा निर्णय बीसीसीआयेने घेतला आहे.

काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवानांच्या कुटुंबीयांना २० कोटींची मदत देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. ही रक्कम आर्मी वेल्फेअर फंडात जमा करण्यात येणार आहे. यापूर्वी बीसीसीआयने आगामी विश्वचषकात होणाऱ्या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या ताब्यातून सुटुन भारतात परतलेल्या अभिनंदन वर्थमान यांच्या नावाची टोपी घालून मैदानात उतरणार असल्याचे आपल्या ट्विटर वरुन जाहीर केले आहे. तर भारत आणि ऑस्टेलिया दरम्यान, रांची येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आर्मी टोप्या घालून मैदानात उतरत शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यामुळे बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

आयपील शुभारंभाला अधिकाऱ्यांना आमंत्रण

येत्या २३ तारखेला सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १२ व्या हंगामाचा चेन्नई येथे शुभारंभ होणार आहे. शुभारंभाच्या या प्रसंगी हवीई दल, नौदल तसेच लष्काराच्या अधिकाऱ्यांना अमंत्रित केला जाण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. बीसीसीआयच्या प्रशासक समितीने जवानांना आर्थिक मदत म्हणून दिला जाणारा २० कोटींचा निधी हा आर्मी वेलफेयर फंडात जमाकरण्यास मान्यता दिली आहे.

- Advertisement -

धोनी, विराटची उपस्थित

आयपील १२ चा पहिला सामना चेन्नई येथे चेन्नई सुपर किंग विरुद्ध रॉयल चॅलेंजस बेंगळुर यांच्यात रंगणार आहे. या सामन्याला भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिग धोनी उपस्थित राहणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, आयपीएलच्या मागच्या हंगामात शुभारंभाला १५ कोटी खर्चकरण्यात आले होत. आयपीएलच्या या १२ हंगामात शुभारंभाला वीस कोटींचा खर्च केला जाणार आहे ही रक्कम आर्मी वेल्फेअर फंडात जमा करण्यात येणार असल्याचे समजते.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -