घरक्रीडाBCCI कडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब

BCCI कडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब

Subscribe

अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांची नावं बीसीसीआयने सुचवली आहेत

भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे. प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावे पाठवत असते. यंदा एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचे नाव खेलरत्न पुरस्कारसाठी पाठवले आहे.

२०१९ विश्वचषकात ५ शतकांसह केलेली धडाकेबाज कामगिरी आणि याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये केलेले दमदार पुनरागमन यामुळे बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. याशिवाय अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांची नावं बीसीसीआयने सुचवली आहे. २०१८ मध्ये अर्जुन पुरस्कारासाठी बोर्डाने धवनचे नाव देखील पाठवले होते मात्र त्याला तो पुस्कार मिळाला नाही.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराहचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी यादीत होते. मात्र अखेरीस सिनीअर खेळाडूंसोबतच्या शर्यतीत त्याचे नाव मागे पडल आहे. २०१८ सालीही शिखरचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्यात आले होते. मात्र अंतिम यादीत त्याची निवड झालेली नव्हती. त्यामुळे यंदाच्या वर्षात कोणत्या खेळाडूची मानाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे ऑनलाइन अर्ज मागविले गेले

कोरोना व्हायरसमुळे क्रीडा मंत्रालयाने यावेळी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी स्पर्धकांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागितले आहेत. नामनिर्देशन पाठविण्याची प्रक्रिया दरवेळी एप्रिलमध्ये सुरू होते. परंतु यावेळी लॉकडाऊनमुळे मे महिन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.


‘या’ कारणामुळे मोहम्मद शमी अर्जुन पुरस्कारापासून वंचित…
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -