भारतीय चाहत्यांमुळं तुला पगार मिळतो, BCCIनं विराटला सुनावलं

 चाहत्यांनी पाठ फिरवल्यास बीसीसीआय आणि खेळाडू दोघे अडचणीत येतील, शिवाय भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, तु पैसे कमावतोस, हे विसरू नकोस. अशा शब्दात विराट कोहलीला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सुनावलं आहे. त्यामुळे चाहत्याला टोला लगावणाऱ्या विराटसमोरच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. कारण पहिल्यांदाज पहिल्यां

Delhi
bccci and virat kohli

भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर हा देश सोड. हवं तर दुसऱ्या देशात जाऊन राहा अशा शब्दात विराट कोहलीनं चाहत्याला ट्विटरवरून टोला लगावला होता. पण, त्यावरून आता बीसीसीआयनं विराट कोहलीला खडे बोल सुनावले आहे. चाहत्यांनी पाठ फिरवल्यास बीसीसीआय आणि खेळाडू दोघे अडचणीत येतील, शिवाय भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, तु पैसे कमावतोस, हे विसरू नकोस. अशा शब्दात विराट कोहलीला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सुनावलं आहे. त्यामुळे चाहत्याला टोला लगावणाऱ्या विराटसमोरच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. कारण पहिल्यांदाच पहिल्यांदाच बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं या प्रकरणामध्ये आपले मत व्यक्त केले आहे. दरम्यान, विराटचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपल्याला विराटचे हे उत्तर आवडले नसल्याचे म्हटलं आहे. त्यावरून विराट ट्विटरवर ट्रोल देखील झाला. आता यामध्ये बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी विराटला सुनावले.

चार दिवसांपूर्वी ट्विटरवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विराट मोबाईलवर काहीतरी वाचताना दिसत आहे. भारतीय फलंदाजांच्या तुलनेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा खेळ अधिक आनंददायी असतो असं ट्विट एका चाहत्यानं केलं. त्यावर विराट कोहलीनं तुम्ही भारतात राहू नका. तुम्हाला दुसरे देश आवडतात तिकडे जा असे सुनावले होते. त्यावरून बीसीसीआयनं देखील विराट कोहलीला खडे बोल सुनावले आहे.

वाचा – चाहत्याला देश सोडून जा सांगितल्यामुळे विराट झाला ट्रोल

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here