घरक्रीडाहार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलवर निलंबनाची कारवाई

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलवर निलंबनाची कारवाई

Subscribe

जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत पांड्या-राहुल यांना भारतीय संघातून निलंबित करण्यात आले आहे. हा निर्णय प्रशासकिय समितीच्या सदस्या डायना एडुल्जी यांच्या प्रस्तावानंतर घेतला आहे.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये केलेले वादग्रस्त वक्तव्य क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना महागात पडले आहे. बीसीसीआयने दोघांवर देखील निलंबनाची कारवाई केली आहे. चौकशी संपेपर्यंत दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली असून दोघांनाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलवण्यात आले असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. कॉफी विथ करण या शो मध्ये त्यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. दरम्यान, करण जोहरच्या हा शो स्टार नेटवर्कने बंद केला आहे.

- Advertisement -

चौकशी होईपर्यंत निलंबन

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती बीसीसीआयचे प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत पांड्या-राहुल यांना भारतीय संघातून निलंबित करण्यात आले आहे. हा निर्णय प्रशासकिय समितीच्या सदस्या डायना एडुल्जी यांच्या प्रस्तावानंतर घेतला आहे. हार्दिक आणि राहुल यांच्या दोन सामन्यावर बंदीची शिफारस करण्यात आली होती. दरम्यान, बीसीसीआयची कायदेशीर टीम चॅट शोमध्ये केलेल्या वक्तव्याला कोड ऑफ कंडक्टच्या विरोधात मानत नाहीये.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बोलावले माघारी

दरम्यान, एडूल्जी यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांचे उदाहरण देत लैंगिक शोषणाचे आरोप लगावल्यानंतर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी पीटीआयला विनोद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चौकशीपर्यंत दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून दोघांना माघारी बोलावण्यात आले आहे.

- Advertisement -

हार्दिकने मागितली माफी 

महिलांवर केलेल्या वादग्रस्त विधानावर भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्यानं माफी मागितली आहे. कॉफी विथ करणमध्ये हार्दिक पांड्यानं अनेक वादग्रस्त विधानं केली होती. त्यानंतर नेटीजन्सनी हार्दिक पांड्यावर टीका केली. सोशल मीडियावर झालेल्या टीकेनंतर हार्दिक पांड्यानं कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागतो असं म्हटलं आहे. मी करणच्या शोमध्ये गेलो होतो त्याठिकाणी मी खूप वक्तव्य केले होती मात्र माझ्या लक्षात आले नाही की, यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जातील. मी यासाठी माफी मागतो, असे हार्दिकने म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -