घरक्रीडाटीम इंडियाच्या मेन्यूतून 'बीफ' वगळा- BCCI

टीम इंडियाच्या मेन्यूतून ‘बीफ’ वगळा- BCCI

Subscribe

बीसीसीआयच्या पथकाने भारतीय खेळाडूंच्या मेन्यूमध्ये फक्त शाकाहारी पदार्थांचा समावेश करावा, अशी शिफारस आस्ट्रेलिया क्रिकेट महामंडळाकडे केली आहे. 

यंदाच्यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या इंग्लंड दौऱ्याच्यावेळी टीम इंडियाच्या लंच मेन्यूमध्ये ‘ब्रेस्ड बीफ पास्ता’चा समावेश करण्यात आला होता. या मुद्द्यावरुन बीसीसीआयवर टीकेची झोड उठली होती. याच मुद्द्यावरुन बीबीसीयाने आता एक ठोस पाऊल उचललं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्यावेळी भारतीय संघाच्या मेन्यूमधून बीफ काढून टाकावं, अशी शिफारस बीसीसीआयनं आस्ट्रेलिया क्रिकेट महामंडळाकडे केली आहे. याच महिन्यामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यादरम्यान ३ टी-२० सामने, ४ कसोटी सामने आणि ३ एकदिवसीय सामने होतील. या दौऱ्याशी निगडीत खेळाडूंचा सराव, त्यांच्या खाण्यापिण्याची आणि प्रवासाची व्यवस्था याविषीया आढावा घेण्यासाठी बीसीसीआयचं पथक ऑस्ट्रेलियाला गेलं होतं. या भेटीदरम्यान बीसीसीआयच्या पथकाने भारतीय खेळाडूंच्या मेन्यूमध्ये फक्त शाकाहारी पदार्थांचा समावेश करावा, अशी शिफारस केली आहे.


वाचा: ‘बीफ पास्ता’ मेन्यूवरून सोशल मीडियावर संताप

याआधीही खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मिळणाऱ्या जेवणाबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये मिळणाऱ्या बीफ किंवा अन्य मांसाहारी पदार्थांमुळे शाकाहरी खेळांडूना जास्तच त्रास होतो. मात्र, आता या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील एका भारतीय रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाशी बोलणं झाल्याची माहिती, बीसीसीआयच्या पथकातील सूत्रांनी मुंबई मिरर वृत्तपत्राला दिली आहे. यामुळे लवकरच शाकाहरी खेळाडूंची होणारी गैरसोय दूर होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -