घरक्रीडाबीसीसीआय करणार जम्मू-काश्मीर क्रिकेटची मदत

बीसीसीआय करणार जम्मू-काश्मीर क्रिकेटची मदत

Subscribe

बीसीसीआयने जम्मू-काश्मीर क्रिकेटला मदत करण्याचे वचन दिले आहे, असे विधान जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असणार्‍या इरफान पठाणने केले. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला.

त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील फोन सेवा, इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्याने क्रिकेट असोसिएशन आणि खेळाडूंचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनला बीसीसीआयची स्थानिक स्पर्धा विझी करंडकातून माघार घ्यावी लागली. मात्र, यापुढे असे होऊ नये यासाठी बीसीसीआय जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनची मदत करणार आहे.

- Advertisement -

क्रिकेट असोसिएशन आणि खेळाडूंचा संपर्क होऊ शकत नसल्याचा आगामी स्थानिक मोसमावर परिमाण होणार नाही, अशी मला आशा आहे. मी बीसीसीआयशी याबाबत चर्चा केली आहे आणि त्यांनी जम्मू-काश्मीर क्रिकेटला मदत करण्याचे वचन दिले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच सगळे पूर्ववत होईल आणि आम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी दुसर्‍या ठिकाणी जावे लागणार नाही, अशी मला आशा आहे. आम्ही विझी करंडकात खेळणार नाही, कारण आमच्या खेळाडूंना सराव करण्यासाठी वेळ मिळालेला नाही, असे पठाण म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -