Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा भारतीय क्रिकेटपटूंकडून ऑस्ट्रेलियाच्या बायो सिक्युरिटीचे उल्लंघन

भारतीय क्रिकेटपटूंकडून ऑस्ट्रेलियाच्या बायो सिक्युरिटीचे उल्लंघन

बीसीसीआय करणार चौकशी

Related Story

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाच्या बायो सिक्युरिटी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच भारतीय क्रिकेटपटूंची चौकशी केली जाणार आहे. यासंदर्भात एका व्हिडिओ समोर येत आहे. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह, ऋषभ पंत, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि पृथ्वी शॉ एका रेस्टॉरंटमध्ये गप्पा मारताना दिसत आहेत. त्याचवेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या भारतीय चाहत्यानं त्यांचा व्हिडीओ टिपून सोशल मीडियावर शेअर केला होता.

मेलबर्नमधील बीबीक्यू असे या रेस्टॉरंटचे नाव असून पाचही क्रिकेटर्स या रेस्टॉरंटमधील सिक्रेट किचनमध्ये खाऊन झाल्यावर गप्पा मारत आहेत. परंतु या रेस्टॉरंटच्या नियमानुसार रेस्टॉरंटच्या बाहेर बसून खाण्यास परवानगी आहे. परंतु हे पाचही क्रिकेटपटू रेस्टॉरंटच्या आता बसून गप्पा मारत, खात आहेत. या रेस्टॉरंटच्या नियमानुसार खेळाडूंना बाहेर जाण्यास परवानगी आहे परंतु बाहेर गेल्यानंतर त्यांना रेस्टॉरंटच्या बाहेरच राहणे गरजेचे आहे. सिनडी मॉर्निग हेराल्ड आणि द एज से रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी या व्डिडिओची माहिती देत सांगितले की, या पाचही खेळाडूंनी रेस्टॉरंटमध्ये फेरफटका मारला आणि रेस्टॉरंटच्या आतच बसले.

- Advertisement -

नवदीप सिंग नावाच्या एका भारतीय क्रिकेट चाहत्याने रेस्टॉरंटमधील क्रिकेटपटूंचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात भारतीय क्रिकेटपटू ११८.६९ डॉलर एवढे बिल भरताना दिसत आहेत. चाहत्याने या क्रिकेटपटूंचे शॉपिंग करतानाचे अनेक फोटोही पोस्ट केलेत.

- Advertisement -

परंतु क्रिकेटपटूंनी रेस्टॉरंटच्या नियमांचे केलेल्या उल्लंघन गंभीर गुन्हा मानला जात आहे. कारण विक्टोरियातील मेलबर्न आणि सिडनीमध्ये कोव्हिड संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत, आणि त्यातच ७ जानेवारी रोजी क्रिकेटची टेस्ट मॅच खेळली जाणार आहे. त्यामुळे वाढती रुग्ण संख्या पाहता मेलबर्नमध्ये नियम अधिक कडक करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाविषयक प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं अथवा नाही याचा तपास करण्यासाठी या पाचही क्रिकेटपटूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं म्हटलं आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या माहितीनुसार, सोशय मिडियावर क्रिकेटपटूंच्या व्हायरल व्डिडिओसंदर्भात बीबीसीआय चौकशी करणार आहे. परंतु यासंदर्भात बीसीसीआयच्या प्रवक्तांनी बोलण्यास नकार दिला आहे. क्रिकेटर्सने ऑस्ट्रेलियाकडून यावर उत्तर मागितले आहे. पण अद्याप उत्तर आलेले नाही.

क्रिकेट चाहता नवदीपने याचा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, क्रिकेटपटूंना माहितीच नाही की त्यांचे बिल कोणी भरले… आपल्या सुपरस्टार्ससाठी तर आपण एवढे करुचं शकतो… जेव्हा त्यांना माहिती पडले की, मी बिल भरले तेव्हा रोहित म्हणाला भावा पैसे घे बरे नाही वाटत असे… त्यावेळी मी उत्तर दिले, नाही सर… मी देतो.
यावेळी पंतने नवदीपला मिठी मारत सांगितले की, पैसे घेतलेसं तरचं फोटो काढेन.. यावर नवदीपने सांगितले, नाही भावा नाही जमणार… आणि शेवटी सगळ्यांनी सोबत फोटो काढला… मज्जा आली. असा अनुभव नवदीपने शेअर केला आहे.


हेही वाचा – BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका

- Advertisement -