घरक्रीडाक्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम सामना!

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम सामना!

Subscribe

क्रिकेटच्या इतिहासात यापेक्षा चांगला सामना झाला असेल असे मला वाटत नाही, असे विधान इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर बेन स्टोक्सने केले. कधीही विश्वचषक न जिंकलेल्या या संघांमधील अंतिम सामना रविवारी लॉर्ड्सवर झाला. या लढतीतील नियमित सामन्यात दोन्ही संघांनी ५० षटकांत २४१ धावा काढल्या, त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १५-१५ धावा केल्या. नियमित सामन्यात इंग्लंडला, तर सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज होती.

मात्र, दोन्ही वेळा १ धाव पूर्ण करून दुसर्‍या धाव काढण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत झाले. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकार मरणार्‍या संघाला विजयी घोषित करण्यात आले. इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा ९ चौकार-षटकार (२६-१७) जास्त लागवल्याने त्यांनी पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या सामन्यात अष्टपैलू बेन स्टोक्सने नाबाद ८४ धावांची खेळी करत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

- Advertisement -

आम्ही यासारख्या सामन्यांसाठीच क्रिकेट खेळतो. हा सामना फारच अप्रतिम झाला. क्रिकेटच्या इतिहासात यापेक्षा चांगला सामना झाला असेल किंवा यापुढे असा सामना पुन्हा होईल असे मला वाटत नाही. न्यूझीलंडने या सामन्यात फारच उल्लेखनीय खेळ केला. आमच्या संघाने मागील चार वर्षांत खूप मेहनत घेतली आहे. आम्ही ही मेहनत विश्वविजेते होण्यासाठीच घेतली होती. आमच्या कष्टांचे चीज झाले, असे स्टोक्स म्हणाला.

इंग्लंडला अखेरच्या ३ चेंडूत ९ धावांची गरज असताना २ धावा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात स्टोक्सने उडी मारली. मात्र, मार्टिन गप्टिलने फेकलेला चेंडू उडी मारणार्‍या स्टोक्सच्या बॅटला लागल्यामुळे इंग्लंडला ६ धावा मिळाल्या. याबाबत स्टोक्सने सांगितले, चेंडू माझ्या बॅटला लागावा असा माझा हेतू नव्हता. परंतु जे झाले, ते न्यूझीलंडच्या दृष्टीने फार दुर्दैवी होती. त्यामुळे सामन्यानंतर मी केनची (विल्यमसन) क्षमा मागीतली आणि आयुष्यभर मागत राहीन.

- Advertisement -

पंचांचा निर्णय चुकला – सायमन टॉफल

न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात २४२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला अखेरच्या ३ चेंडूत ९ धावांची आवश्यकता असताना मार्टिन गप्टिलने फेकलेला चेंडू २ धावा पूर्ण करण्यासाठी उडी मारणार्‍या स्टोक्सच्या बॅटला लागल्यामुळे इंग्लंडला ६ धावा मिळाल्या. मात्र, पंचांनी इंग्लंडला ६ धावा नाही, तर ५ धावाच दिल्या पाहिजे होत्या, असे मत माजी पंच सायमन टॉफल यांनी व्यक्त केले. पंचांनी इंग्लंडला ६ नाही, तर ५ धावा दिल्या पाहिजे होत्या. पंचांनी चुकीचा निर्णय दिला. मात्र, अशा दबावाच्या परिस्थितीत चुका होणे स्वाभाविक आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू जेव्हा फेकला, त्यावेळी दुसरी धाव घेताना फलंदाजांनी एकमेकांना क्रॉस केले असे पंचांना वाटले असणार. मात्र, रिप्लेमध्ये त्यांचा निर्णय चुकला हे दिसले, असे टॉफल म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -