घरक्रीडाशिवनेरी कबड्डी स्पर्धा : अंतिम सामन्यात भारत पेट्रोलियम-पश्चिम रेल्वे आमनेसामने

शिवनेरी कबड्डी स्पर्धा : अंतिम सामन्यात भारत पेट्रोलियम-पश्चिम रेल्वे आमनेसामने

Subscribe

शिवनेरी सेवा मंडळ सुवर्ण महोत्सवी कबड्डी स्पर्धेतील विशेष व्यवसायिक गटाच्या अंतिम फेरीत भारत पेट्रोलियम (बी.पी.सी.एल) आणि पश्चिम रेल्वे यांचा सामना होणार आहे.

दादर येथे सुरू असलेल्या शिवनेरी सेवा मंडळ सुवर्ण महोत्सवी कबड्डी स्पर्धेतील विशेष व्यवसायिक गटाच्या अंतिम फेरीत भारत पेट्रोलियम (बी.पी.सी.एल) आणि पश्चिम रेल्वे यांचा सामना होणार आहे. या गटातील विजेत्या संघाला कै. राजाराम शेठ लाड सुवर्ण चषक देण्यात येईल.

बी.पी.सी.एलची महिंद्रा अँड महिंद्रावर मात

विशेष व्यवसायिक गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात बी.पी.सी.एलने महिंद्रा अँड महिंद्राचा २५-२४ असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. बी.पी.सी.एलकडून निलेश शिंदे याने १० चढाई करून एकूण ६ गुण मिळवले. त्याला अजिंक्य करपेने ३ गुण मिळवत तर आकाश अडसूळने ४ गुण मिळवत चांगली साथ दिली. महिंद्राकडून ओंकार जाधव याने १२ चढाईत एकूण ५ गुण मिळवले. त्याला स्वप्नील शिंदेने १ सुपर कॅच करत चांगली साथ दिली.

पश्चिम रेल्वेची युनिअन बँकेवर मात

तर दुसऱ्या उपांत्य फेरीत पश्चिम रेल्वेने युनिअन बँकेवर अटीतटीच्या सामन्यात ४४-४३ असा विजय मिळवला. या सामन्याच्या मध्यंतराला युनिअन बँकेकडे ९ गुणांची आघाडी होती. पण मध्यंतरानंतर पश्चिम रेल्वेने पुनरागमन करत हा सामना जिंकला. पश्चिम रेल्वेकडून सुनील जयपालने १६ चढाईत १५ गुण मिळवले, ज्यात एका सुपर रेडचा समावेश होता. त्याला चेतन थोरातने ९ गुण मिळवत चांगली साथ दिली. त्यामुळे पश्चिम रेल्वेने अंतिम फेरीत प्रवेश केला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -