घरक्रीडाचेंडूला तकाकी आणण्यासाठी गोलंदाजांना थुंकीला पर्याय हवा!

चेंडूला तकाकी आणण्यासाठी गोलंदाजांना थुंकीला पर्याय हवा!

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) करोनानंतर पुन्हा क्रिकेट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. यामध्ये चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यातच थुंकीऐवजी कृत्रिम पदार्थ वापरण्यालाही परवानगी देण्यात आलेली नाही. या नव्या नियमांमुळे गोलंदाजांचे काम अधिकच अवघड होणार आहे, असे अनेकांना वाटत आहे. त्यामुळे बर्‍याच आजी-माजी गोलंदाजांनी थुंकीला पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी आयसीसीकडे केली असून आता यात भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही समावेश झाला आहे.

आयसीसीने विकेट घेतल्यावर जल्लोष करताना मिठ्या मारण्यावर आणि हस्तांदोलन करण्यावर बंदी घातली आहे. मी या गोष्ट फार करत नसल्याने मला चिंता नाही. परंतु, चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी घातली ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे. पुन्हा क्रिकेट सुरु करण्यासाठी आयसीसीची मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत हे मला नक्की माहीत नाहीत. परंतु, थुंकीला पर्याय असलाच पाहिजे. चेंडू जर योग्य स्थितीत राखण्यात अपयश आले, तर गोलंदाजांचे काम खूपच अवघड होईल.

- Advertisement -

आता सीमारेषा अधिकच जवळ आणल्या जात आहेत. मैदाने छोटी होत आहेत आणि खेळपट्ट्या पाटा होत आहेत. त्यामुळे गोलंदाजांसाठी काहीतरी मदत असायला हवी. चेंडू स्विंग किंवा रिव्हर्स स्विंग व्हावा यासाठी थुंकीला पर्याय असला पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना थोडी मदत असते. परंतु, एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन नवे चेंडू वापरले जातात. त्यामुळे डावाच्या शेवटीही चेंडू रिव्हर्स स्विंग होत नाही, असे बुमराहने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -