घरIPL 2020टी-२० मध्ये एका षटकात दोन बाऊंसर्स टाकण्याची परवानगी असावी - गावस्कर

टी-२० मध्ये एका षटकात दोन बाऊंसर्स टाकण्याची परवानगी असावी – गावस्कर

Subscribe

सध्या गोलंदाजाला एका षटकात एकच बाऊंसर टाकता येतो. 

टी-२० हा सध्याच्या घडीला क्रिकेटचा सर्वात लोकप्रिय प्रकार मानला जातो. आयपीएल, बिग बॅश लीग यांसारख्या स्पर्धांमुळे टी-२० क्रिकेटचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाज मोठमोठे फटके अगदी सहजपणे मारताना दिसतात. त्यातच खेळपट्ट्या या फलंदाजीला अनुकूल बनवण्यात येतात. त्यामुळे गोलंदाजांचे महत्त्व कमी होत चालल्याची भीतीही काही क्रिकेट समीक्षक व्यक्त करत आहेत. मात्र, गोलंदाज अजूनही तितकेच महत्त्वाचे असून टी-२० क्रिकेटमध्ये त्यांच्यावरील दबाव कमी करण्यासाठी एका षटकात दोन बाऊंसर्स टाकण्याची परवानगी असली पाहिजे, असे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना वाटते.

टी-२० हे फलंदाजांचे क्रिकेट

टी-२० क्रिकेट सध्या चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे यात फार बदल करण्याची आवश्यकता नाही. मात्र, टी-२० हे फलंदाजांचे क्रिकेट आहे. यातील बहुतांश नियम फलंदाजीला साजेसे आहेत. त्यामुळे गोलंदाजांवरील दबाव कमी करण्यासाठी त्यांना एका षटकात दोन बाऊंसर्स टाकण्याची परवानगी दिली पाहिजे. सीमारेषाही सहजपणे अधिक दूरवर ठेवता येतील. जेणेकरून चौकार-षटकार मारणे अवघड होईल. तसेच ज्या गोलंदाजाने त्याच्या पहिल्या तीन षटकांमध्ये एकतरी विकेट घेतली असेल, त्याला अतिरिक्त षटक टाकता आले पाहिजे. मात्र, अगदी खरे सांगायचे तर टी-२० क्रिकेटमध्ये कोणतेही बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे गावस्कर यांनी नमूद केले. तसेच नॉन-स्ट्राईकवर असलेला फलंदाज हा गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधीच क्रिजबाहेर पडत असेल तर त्यावर तिसऱ्या पंचांचे लक्ष असले पाहिजे असेही गावस्कर यांना वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -