घरक्रीडानेयमार पडताच फुकटची दारू; ब्राझीलमधील बारमालकाचे अजब फुटबॉलप्रेम

नेयमार पडताच फुकटची दारू; ब्राझीलमधील बारमालकाचे अजब फुटबॉलप्रेम

Subscribe

बुधवारच्या मॅचमध्ये नेयमार जितक्या वेळा पडेल तितक्या वेळा उत्तर रिओमध्ये असणाऱ्या सर वॉल्टर बारकडून मद्याचे शॉट्स मोफत देण्यात येणार आहेत

फिफाचा २१वा विश्वचषक स्पर्धेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आला आहे. ए आणि बी गटातून रशिया, उरूग्वे, स्पेन आणि पोर्तुगाल हे संघ बाद फेरीत पोहोचले आहेत. तर बाकी गटातही आता चुरशीच्या लढती होताना आपल्याला दिसत आहेत. अशावेळी जगभरातील फुटबॉलप्रेमी आपल्या संघांला आवडत्या खेळाडूला शुभेच्छा देण्यासाठी नवनवीन गोष्टी करत असतात. ब्राझीलमधील एका बारने एक अनोखी शक्कल लढवली आहे. बारने अशी ऑफर दिली आहे की, ब्राझील आणि सर्बिया यांच्यात होणाऱ्या सामन्यादरम्यान ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमार जितक्या वेळा पडेल तितक्या वेळा सर वॉल्टर बारकडून बुधवारी मद्याचे शॉट्स मोफत देण्यात येणार आहेत.
या ऑफर बद्दल सर वॉल्टर पबने स्वत:च्या फेसबुक पेजवरुन याविषयीची माहिती दिली आहे.

neymar pub
ब्राझीलच्या सर वॉल्टर पबमधील ही अजब ऑफर त्यांच्या फेसबुक पेजवर टाकण्यात आली आहे

नेयमारवर सर्वांचे लक्ष

ब्राझीलचा संघ जगभरातील फूटबॉल प्रेमींसाठी लाडका आहे आणि ब्राझीलचा नेयमार फूटबॉल खेळाडूंच्या गळ्यातील ताईत बनला आहे. अशावेळी ब्राझीलविरूद्ध सर्बिया महत्वाच्या लढतीत नेयमारवर सर्वांचेच लक्ष असणार आहे. ब्राझील संघांचाही भार हा नेयमारवर आहे. मागच्या अनेक सामन्यात नेयमारला अडविण्यासाठी विरोधी खेळाडू त्याला सामन्यादरम्यान पाडून जखमी करण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टीच्या निषेधार्थ या पबने ही ऑफर ठेवली आहे. यासोबतच या पबने स्वत:ची जाहिरात करण्याकरीताही ही ऑफर ठेवली असल्याचीदेखील चर्चा आहे.

- Advertisement -
neymar
नेयमार

ब्राझील आणि सर्बियातील लढत चुरशीची

बुधवारी होणारा एफ गटातील ब्राझीलविरूद्ध सर्बिया हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. कारण जो जिंकेल तो थेट बाद फेरीत जाणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या लढतीकडे असणार आहे. ब्राझीलच्या जास्त आशा नेयमार आणि कुटिन्हो याच्यांवर तर सर्बियाच्या आशा या मित्रोविचवर असणार आहेत.

brazil vs serbia
ब्राझीलविरूद्ध सर्बिया

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -