घरक्रीडालढा दिल्याशिवाय हार मानली नाही - कार्लोस ब्रेथवेट

लढा दिल्याशिवाय हार मानली नाही – कार्लोस ब्रेथवेट

Subscribe

भारताविरुद्धची टी-२० मालिका ३-० अशी गमावली असली तर ज्याप्रकारे विंडीजने लढा दिला तो समाधानकारक होता असे कर्णधार कार्लोस ब्रेथवेटचे म्हणणे आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिका वेस्ट इंडिजने ३-० अशी गमावली. या मालिकेतील तिसरा सामना भारताने ६ विकेट राखून जिंकला. या मालिकेत भारताकडून व्हाईटवॉश झाला असला तरी आम्ही चांगला लढा दिला असे विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटचे म्हणणे आहे.

एकत्रित होऊन लढा दिला 

ब्रेथवेट वेस्ट इंडिजच्या प्रदर्शनाबद्दल म्हणाला, “भारताने ३-० अशी मालिका जिंकली हे माझ्यासाठी कर्णधार म्हणून खूपच लाजिरवाणे आहे. पण आमचे प्रदर्शन आणि आम्ही ज्याप्रकारे लढलो ते खूपच वाखाणण्याजोगे होते. आमचे बरेच अनुभवी खेळाडू या मालिकेत खेळले नाहीत. असे असूनही आमचे खेळाडू ज्याप्रकारे एकत्रित होऊन खेळले ते माझ्यासाठी खूप समाधानकारक होते.”

ज्यापद्धतीने खेळलो ते खूप समाधानकारक  

भारताविरुद्धच्या मालिकेविषयी ब्रेथवेट म्हणाला, “आम्ही या मालिकेत आमच्या खेळाडूंच्या सर्वोत्तम बाबींवर लक्ष केंद्रित केले. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात आम्ही भारताला चांगला लढा दिला. आमच्या गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले. दुसऱ्या सामन्यात आम्ही चांगले खेळलो नाही. तर तिसऱ्या सामन्यात आमच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण धवन आणि पंतच्या भागीदारीमुळे आम्ही हा सामना गमावला. पण या सामन्यातही आम्ही शेवटपर्यंत लढा दिला. आम्ही ज्यापद्धतीने खेळलो ते खूप समाधानकारक होते.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -