घरक्रीडामोहम्मद शमीच्या अडचणी वाढल्या; वर्ल्ड कप खेळणं धोक्यात

मोहम्मद शमीच्या अडचणी वाढल्या; वर्ल्ड कप खेळणं धोक्यात

Subscribe

मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. कोलकाता पोलिसांनी शमीच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहेत. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये शमीला खेळता येऊ शकणार नाही.

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी वर्ल्ड कपमध्ये कदाचीत मोहम्मद शमीला खेळता येणार नाही. मोहम्मद शमीच्या विरोधात कोलकाता पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ ‘अ’ (हुंड्यासाठी छळ) आणि ३५४ ‘अ’च्या (शारीरीक छळ) अंतर्गत शमीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचं वर्ल्ड कप खेळणं धोक्यात आलं आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने केलेल्या तक्रारीनंतर कोलकाता पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या एक वर्षांपासून मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरु आहे. हसीनने आपल्या पतीवर विवाहबाह्य संबंध, मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. सोशल मीडियावर शमीने केलेल्या चॅटचे फोटो टाकून हसीनने खळबळ उडवून दिली होती. शिवाय, मोहम्मद शमीवर मॅच फिक्सिंगचा देखील आरोप केला होता. त्यामुळे दोघे पती-पत्नी चांगले चर्चेत आले होते. हसीनने कोर्टामध्ये आपल्या पतीकडून मुलीच्या आणि स्वत:च्या खर्चासाठी दरमहा १० लाख रुपये मिळावे, अशी मागणी केली होती. हसीन जहॉंने केलेल्या आरोपांची तपासणी पोलिसांकडून केली जात होती. यानंतर आता कोलकाता पोलिसांकडून मोहम्मद शमीच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी २२ जूनला होणार आहे.

- Advertisement -

मॅच फिक्सींगचा केला होता आरोप

हसीन जहाँने मोहम्मद शमीवर बरेच आरोप केले होते. शमीचे बऱ्याच स्त्रियांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप तीने केला होता. त्याचबरोबर शमीची पाकिस्तानमध्येही एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असाही आरोप तिने केला होता. यानंतर तिने शमीवर मॅच फिक्सींगचा आरोप केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -