घरक्रीडाभज्जी,ताहिरकडून बंगळूरूची ‘फिरकी’

भज्जी,ताहिरकडून बंगळूरूची ‘फिरकी’

Subscribe

जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींची पसंती लक्ष लागून राहिलेल्या आयपीएलच्या बाराव्या पर्वाला शनिवारपासून दमदार सुरूवात झाली. पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले. उत्साहाने भरलेल्या वातावरणात सामन्याला सुरूवात झाली. चेन्नईच्या घरच्या मैदानावर हा सामना होत असल्यामुळे एकंदरित संघाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.तसेच बंगळूरू संघाकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या.परंतु,हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर यांच्या दमदार फिरकीच्या जोरावर आरसीबीचा संघ अवघ्या 71 धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेऊ शकला. नानेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्णधार विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांची अनुभवी जोडी मैदानात उतरताच बंगळूरूच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.नेहमीच दमदार कामगिरी करणारा विराट कोहली पुन्हा एकदा जबरदस्त खेळी करणार अशी अपेक्षा असताना हरभजनच्या गोलंदाजीवर तो जडेजाकरवी झेलबाद झाला.कोहलीने केवळ 12 चेंडूंत 6 धावा केल्या.त्यानंतर भरवशाचे मोईन अली आणि डीव्हिलियर्स हे भरवशाचे खेळाडू देखील वैयक्तिक 9 धावा करून माघारी परतले.

- Advertisement -

विशेष म्हणजे या तिघांचा बळी हरभजनने घेतला.त्यामुळे बंगळूरूची अवस्था 3 बाद 38 अशी दयनीय झाली.त्यानंतर भारतीय दौर्‍यात चमकलेला वेस्ट इंडिजचा शिमरन हेटमायर देखील भोपळा न फोडताच बाद झाला. त्यानंतर देखील बंगळूरूच्या संघांची दयनीय अवस्था कायम राहिली. नवोदित शिवम दुबे(2),ग्रॅण्डहोम( 4) आणि सैनी (2),चहल (4)आणि उमेश यादव(2) स्वस्तात बाद झाल्याने बंगळूरूची अवस्था 9 बाद 70 अशी झाली. त्यानंतर सलामीपासून तग धरून राहिलेला पार्थिव पटेल देखील ब्राव्होच्या गोलंदाजीवर केदार जाधवकरवी झेलबाद झाला आणि बंगळूरूचा डाव अवघ्या 70 धावांत संपला. चेन्नईकडून हरभजनने 3, ताहिरने 3,जडजेना 2 तर ब्राव्होने 1 बळी घेतला.

चेन्नईकडून शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

- Advertisement -

या सामन्याआधी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी संघ अशी ओळख असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने सामाजिक भान राखले. २ दिवसांपूर्वीच त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणे चेन्नई सुपर किंग्ज संघाने यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्याच्या तिकीट विक्रीतून मिळालेली कमाई पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना दिली. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने स्वतः २ कोटी रुपयांचा धनादेश शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -