घरक्रीडासिंधू पहिल्याच फेरीत गारद

सिंधू पहिल्याच फेरीत गारद

Subscribe

चीन ओपन बॅडमिंटन

भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूला चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. सहाव्या सीडेड सिंधूचा चिनी तैपेईच्या पाई यु पोने पराभव केला. पुरुष एकेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉयसमोर डेन्मार्कच्या रॅसमस गेमकेने २१-१७, २१-१८ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सिंधूवर चिनी तैपेईच्या पाई यु पोने २१-१३, १८-२१, २१-१९ अशी मात केली. या सामन्याचा पहिला गेम पोने २१-१३ असा सहजपणे जिंकला. मात्र, सिंधूने आपल्या खेळात सुधारणा करत दुसरा गेममध्ये २१-१८ अशी बाजी मारली. तिसरा गेम फारच चुरशीचा झाला.

- Advertisement -

या गेमच्या मध्यंतराला पोने ११-३ अशी भक्कम आघाडी मिळवली होती. मात्र, सिंधूने सलग नऊ गुण मिळवत पोची आघाडी १२-१५ अशी कमी केली. सिंधूने पुन्हा सलग सहा गुण मिळवत १८-१५ अशी आघाडी घेतली. परंतु, यानंतर ७ पैकी ६ गुण मिळवत पोने हा गेम २१-१९ असा जिंकत या स्पर्धेत आगेकूच केली.

पुरुष दुहेरीत भारताची जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टीने या स्पर्धेची विजयी सुरुवात केली. त्यांनी अमेरिकेच्या फिलिप आणि रायन चेववर २१-९, २१-१५ अशी मात केली. मिश्र दुहेरीत सात्विक आणि अश्विनी पोनप्पा यांनाही आपला सामना जिंकण्यात यश आले. महिला दुहेरीत पोनप्पा आणि सिक्की रेड्डी यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -