घरक्रीडापोलादी पडद्याआड लपलेला चिनी ड्रॅगन!

पोलादी पडद्याआड लपलेला चिनी ड्रॅगन!

Subscribe

भारतात पी. टी. उषाचा उदय होत असतानाच्या कालखंडात, छोटा चिनी ड्रॅगन आपली चिमुकली पावलं अ‍ॅथलेटिक्सच्या प्रांगणात टाकण्याचा प्रयत्न करीत होता! पोलादी पडद्याआड केलेली मेहेनत कुणाला दिसणार नाही याची खबरदारी घेत होता! सुवर्णपदक मिळवल्यानंतर त्याचा आनंद चेहेर्‍यावर प्रगट होऊ न देता आशियाई आणि जागतिक पातळीवरचं यश पचवू पाहत होता! याच काळात ’मा जुनरेन’सारखे प्रशिक्षक चिनी अ‍ॅथलेटिक्स संघटनेने पदरी बाळगले. या काहीश्या चमत्कृतीपूर्ण प्रशिक्षण देणार्‍या प्रशिक्षकांच्या हाताखाली चिनी जडीबुटीची औषधे, कासवाचं रक्त प्यायला लावण्याची सक्ती, असे अचाट आणि अफाट ’उद्योग’ माजुनरेन याने केले. त्यामुळे सर्व जगाच्या संशयाची सुई जरी सार्‍या चिनी अ‍ॅथलिट्सवर होती. मात्र, तरीही उत्तेजक चाचणीतून सर्वजण सहीसलामत सुटले.

१९७८च्या बँकॉक एशियाडमधे छोट्या ड्रॅगनच्या पहिल्याच छोट्याश्या धडकेने प्रतिस्पर्ध्यांचा पालापाचोळा झाला. मात्र, तरीही जपानने पदकतालिकेत मागे काढल्याने आणि चक्क १९ सुवर्णपदकांच्या फरकाने मात दिल्याने छोटा ड्रॅगन अस्वस्थ होता. १९७९ च्या जपानमध्ये भरलेल्या आशियाई स्पर्धा शर्यतींत प्रथमच उतरणार्‍या आणि धावण्यात कमी पडणार्‍या छोट्या ड्रॅगनला पुन्हा एकदा जपानने पदक तालिकेत मागे काढलं. यावेळीदेखील चक्क १३ सुवर्णपदकांनी पाठी ठेवून जपानने छोट्या ड्रॅगनला चारी मुंड्या चीत केलं. छोटा ड्रॅगन गरळ ओकतच मायदेशी परतला. बघायला गेलं तर चीनच्या छोट्या ड्रॅगनची कामगिरी पदार्पणात चांगली म्हणावी अशी होती, परंतु पूर्ण हुकूमत,पूर्ण वर्चस्मा ठेवायचा चंग बांधलेल्या छोट्या ड्रॅगनला हा देखील अपमान वाटला आणि यापुढे अपयश किंवा छोटं यश म्हणून पाहायचं नाही असा निर्धार करून तो कसून सरावाला लागला. पुढे जे काही घडलं तो इतिहास आपल्या सर्वांसमोर अगदी ताजा आहे.

- Advertisement -

भारतात १९८२च्या दिल्ली एशियाडमधे ६१ सुवर्णांसह १५३ पदकं; १९८३च्या कुवेतमधील आशियाई स्पर्धा शर्यतींत १६ सुवर्णांसह २४ पदकं, अशी अचाट आणि अफाट कामगिरी करून छोट्या ड्रॅगनने स्वतःच्या महापराक्रमाची दखल समस्त आशिया खंडाला घ्यायला लावली आणि एक प्रकारे स्वतःची दहशत बसवली. जेव्हा १९८४च्या लॉस अँजेलिस ऑलिम्पिकमध्ये छोट्या ड्रॅगनने चौथा क्रमांक पटकावत १५ सुवर्णांसह ३२ पदकं जिंकली, तेव्हा जगाला कळून चुकलं की छोटा ड्रॅगन आता मोठ्ठा झालाय! त्या ड्रॅगनचे बाहू शक्तिशाली झालेत आणि त्याच्या पायात देखील आता वीज खेळू लागली आहे! त्यानंतर चिनी ड्रॅगनने मागे वळून पाहिलंच नाही.

धावण्यात सुरुवातीला कमसर असणार्‍या चिनी ड्रॅगनने आशियाई स्पर्धा शर्यतींत कहर केला. १९८५च्या जकार्ता स्पर्धा शर्यतींत एकूण ४१ सुवर्णांपैकी १९ सुवर्ण ,१९८७च्या सिंगापूर स्पर्धा शर्यतींत एकूण ४२ पैकी २१ सुवर्ण, १९९१च्या कौलालंपूर स्पर्धा शर्यतींत एकूण ४० पैकी २४ सुवर्ण, १९९३च्या मनिला स्पर्धा शर्यतींत एकूण ४० पैकी २३ सुवर्ण, १९९५च्या जकार्ता स्पर्धा शर्यतींत एकूण ४१ पैकी २० सुवर्ण मिळवून चिनी ड्रॅगनने प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडाला फेस आणलाच होता. मात्र, १९९७च्या फुकुओका (जपान) येथील स्पर्धा शर्यतींत, जपानी यजमानासमोर एकूण ४३ पैकी चक्क २६ सुवर्ण जिंकून संपूर्ण आशियाखंड पादाक्रान्त केल्याचे संकेत दिल्यावर चिनी अ‍ॅथलेटिक्स संघटनेने आशियाई पातळीवर कमसर संघ पाठवायला सुरुवात केली. ही गोष्ट भारतीयांना कधीच जमली नाही. भारताला धड सातत्य राखता आलं नाही. उलट बिचार्‍या उषालाच ५-५ शर्यतींत धावडवून बक्षिसं मिळवायची केविलवाणी धडपड करावी लागली. तिथे दुसर्‍या-तिसर्‍या फळीची कल्पना भारत कुठून करणार? याचा अर्थ चिनी अ‍ॅथलेटिक्स विश्वात सारं काही सुरळीत सुरु होतं असं बिलकुल नाही.

- Advertisement -

पोलादी पडद्याआड वेगळ्या गोष्टी घडतंच होत्या. याच काळात ’मा जुनरेन’सारखे प्रशिक्षक चिनी अ‍ॅथलेटिक्स संघटनेने पदरी बाळगले. या काहीश्या चमत्कृतीपूर्ण प्रशिक्षण देणार्‍या प्रशिक्षकांच्या हाताखाली चिनी जडीबुटीची औषधे, कासवाचं रक्त प्यायला लावण्याची सक्ती, असे अचाट आणि अफाट ’उद्योग’ या ’माजुनरेन’ याने केले. स्वतःच्या मोजक्या अ‍ॅथलिट्सचा फौजफाटा घेऊन वावरणार्‍या माजुनरेनच्या अ‍ॅथलिट्सना सारे जग ’मा फॅमिली आर्मी’ म्हणू लागले. परंतु यातूनच वांग जुंक्षीया आणि कु यूंक्षीया यांच्यासारखे अ‍ॅथलिट्स तयार झाले. सर्व जगाच्या संशयाची सुई जरी सार्‍या चिनी अ‍ॅथलिट्सवर असली तरी उत्तेजक चाचणीतून सर्वजण सहीसलामत सुटले. त्यानंतर चिनी ड्रॅगॉनचा दबदबा वाढू लागला. आंतरराष्ट्रीय खेळात उशिरा सहभाग घेऊनसुद्धा अवघ्या १२ एशियाडमध्ये चिनी ड्रॅगॉनने ३१८७ पदकं लुटली. केवळ १० ऑलिम्पिक्सममध्ये ५४६ पदकं लुटली! प्रतिस्पर्ध्याची बोबडी वळवणारीच ही कामगिरी म्हणायची!

दोहामधेसुद्धा स्पर्धा शर्यतींच्या दुसर्‍याच दिवशी ४ सुवर्ण,६ रौप्य आणि ५ रजतपदकं पटकावणार्‍या चिनी ड्रॅगॉनने स्पर्धा शर्यतींवर वर्चस्मा ठेवायला सुरुवात केली आहे खरी, परंतु भविष्याचा वेध घेणारी चिनी ड्रॅगॉनची नजर दोहामधेच ५ महिन्यांनी पुन्हा भरणार्‍या जागतिक स्पर्धा शर्यतींवर असेल! खरी ताकद जगाला दाखवायला चिनी ड्रॅगॉन उत्सुक असेल. त्याअर्थाने ड्रॅगॉनसाठी घोडामैदान जवळ आहे!

– उदय ठाकूरदेसाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -