घरक्रीडायुवराज सिंग विरोधात एफआयआर दाखल, चहलसाठी जातीवाचक शब्दाचा केला वापर

युवराज सिंग विरोधात एफआयआर दाखल, चहलसाठी जातीवाचक शब्दाचा केला वापर

Subscribe

युवराज सिंगला लाईव्ह चॅट करणे महागात पडले आहे.

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंग अडचणीत सापडला आहे. सोमवारी युवराजला रोहित शर्मासोबत लाईव्ह चॅट करणे महागात पडले आहे. या लाईव्ह चॅटदरम्यान युवराज सिंगने जातीवाचक आक्षेपार्ह शब्द उच्चारल्यामुळे एका ठराविक समाजाचा अपमान झाला आहे, असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे याप्रकरणी हरयाण येथील दलित समाजातील मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. रजत कळसन यांनी युवराज विरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर कळसन यांनी रोहितवरही निशाणा साधला आहे. युवराजच्या बेजबाबदार वक्तव्यावर रोहित हसत होता. त्यावेळेस त्यांनी विरोध दर्शवायला हवा होता. पण तो हसत होता आणि त्याने त्यावर सहमत असल्याचे दर्शवले, असे कळसन म्हणाले. तसेच त्यांनी युवराजच्या अटकेचीही मागणी केली आहे. यासंदर्भात पोलिसाचा तपास सुरू आहे.

या लाईव्ह चॅट नंतर सोमवारी रात्रीपासून ट्विवटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. या लाईव्हमध्ये युवराजने युजवेंद्र चहल याला ‘भंगी’ म्हणून संबोधले होते. या शब्दचा अयोग्य वापर झाल्यावर नेटकऱ्यांनी युवराजवर टीकास्त्र सोडले. हे लाईव्ह चॅट रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांच्यामध्ये सुरू होते. त्यावेळी रोहिती सर्वजण निवांत आहेत असे म्हणाला. चहल, कुलदीपही ऑनलाईन आले आहेत. त्यावर मस्करीत चहलबद्दल बोलताना युवराने आक्षेपार्ह शब्द उच्चारला. म्हणून रोहितनेही हसत हसत हा विषय सोडून दिला. पण त्यानंतर नेटकऱ्यांनी युवराज सिंगवर चांगलाच निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – एक एक सामान विकून १०० कुटुंबियांना रोनित करतोय मदत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -