घरक्रीडाविश्वास चषक क्रिकेट स्पर्धा

विश्वास चषक क्रिकेट स्पर्धा

Subscribe

नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेने विश्वास चषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी विश्वास को-ऑपरेटिव्ह बँकेचा पराभव केला. विश्वास को-ऑप बँक लिमिटेड-नाशिक, नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मर्या., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीज यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेची संकल्पना विश्वास ठाकूर यांची होती.

या स्पर्धेत विश्वास को-ऑप. बँक लिमिटेड, नाशिक, नाशिक मर्चन्टस् को-ऑप बँक लिमिटेड, इंडस्ट्रीयल अ‍ॅण्ड मर्कन्टाईल बँक लिमिटेड, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक लिमिटेड, कळवण मर्चन्टस् को-ऑप. बँक लिमिटेड, समर्थ सहकारी बँक लिमिटेड आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड या सहकारी बँकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेला रुपये अकरा हजार रोख रकमेचे प्रथम पारितोषिक व विश्वास चषक देऊन गौरविण्यात आले.

- Advertisement -

तसेच विश्वास को-ऑप. बँकेला रोख रुपये सात हजार आणि चषक देऊन गौरविण्यात आले. सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज म्हणून ललीत भोर (नाशिकरोड व्यापारी बँक), मालिकावीर म्हणून विश्वास बँकेचे संचालक विक्रम उगले यांची निवड झाली. उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार महेश खालकर (आय.एम.सी. बँक) यांनी पटकावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -