घरक्रीडाटी-२० विश्वचषक: सलामी फलंदाजाला दुखापत

टी-२० विश्वचषक: सलामी फलंदाजाला दुखापत

Subscribe

महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला भारतीय संघाने विजयी सुरुवात केली. मात्र सामन्या दरम्यान स्मृती मानधनाला दुखापत झाली आहे.

महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला भारतीय संघाने विजयी सुरुवात केली. मालिकेतील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करण्याचा पराक्रम भारतीय संघाने करुन दाखवला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ११५ धावांवर बाद झाला. भारताने हा सामना १७ धावांनी जिंकत मालिकेची विजयी सुरुवात केली. भारतासाठी हा विजय दणदणीत असला तरीही स्मृती मानधनाच्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

क्षेत्ररक्षण करताना झाली दुखापत 

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधनाला सामन्या दरम्यान खांद्याला दुखापत झाली आहे. सामना सुरू असताना क्षेत्ररक्षण करत असताना सीमाबाहेरील असणाऱ्या बोर्डावर आदळल्याने तिला ही दुखपत झाली. या घटनेनंतर स्मृतीला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. मात्र यानंतर काही वेळातच स्मृती पुन्हा मैदानात उतरली. परंतु ही दुखापत वाढली तर ते भारतासाठी चिंताजनक ठरू शकत.

दरम्यान भारताने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली होती. मात्र ऑस्ट्रेलियाची फिरकीपटूने स जोनासने भारताची सलामी फलंदाज स्मृती मानधना १० धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -