घरक्रीडाWorld Cup 2019: 'या' संघाविरूद्ध भगव्या जर्सीत लढणार भारतीय संघ!

World Cup 2019: ‘या’ संघाविरूद्ध भगव्या जर्सीत लढणार भारतीय संघ!

Subscribe

३० जून रोजी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाचे खेळाडू भगव्या जर्सीमध्ये क्रिकेटप्रेमींना बघायला मिळणार

वर्ल्ड कप सामन्यादरम्यान होणाऱ्या इंग्लड संघाविरूद्ध भारतीय संघाच्या सामन्यात भारतीय संघाचे खेळाडू निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळाताना दिसणार नाही तर ३० जून रोजी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाचे खेळाडू भगव्या जर्सीमध्ये क्रिकेटप्रेमींना बघायला मिळणार आहे.

आयसीसीच्या नियमानुसार, दोन्ही संघ एकच रंग असणारी जर्सी परिधान करू शकत नाही. तसेच, सारख्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरू शकत नाही. त्यामुळे दोघांपैकी एका संघाच्या जर्सीच्या रंगात बदल होऊ शकतो. दरम्यान भारतीय संघाला अफगणिस्तान आणि इंग्लड या देशासोबत सामना खेळायचा आहे. या तिन्ही संघाच्या जर्सीचा रंग निळाच असल्याने या दोन्ही देशांसोबत सामना खेळण्यास मैदानात उतरताना भगव्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे.

- Advertisement -

‘ऑरेंज जर्सी’ बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता

सध्याच्या घडीला भारतीय संघ निळ्या रंगाची जर्सी परीधान करत असला तरी कॉलर मात्र ऑरेंज रंगाची आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ही रंगसंगती उलटी होऊ शकते. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाच्या जर्सीचा रंग ऑरेंज असेल तर कॉलर मात्र निळ्या रंगाची असेल. मात्र ही जर्सी नेमकी असेल तरी कशी, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. कारण या जर्सीचे अनावरण आजून पर्यंत करण्यात आलेले नाही.

- Advertisement -

भारतीय संघाच्या जर्सीतच का बदल…

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सीचा रंग निळा असल्याने एका संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागेल. मात्र यावेळी भारतीय संघाच्या जर्सीच्या रंगातच का बदल, इंग्लंडने आपल्या जर्सीचा रंग बदलावा, असे काही जणांचे म्हणणे आहे. परंतु, नियमानुसार यजमान संघाच्या जर्सीच्या रंगात बदल होत नाही. त्यामुळे इंग्लंड संघाची यामधून सुटका झाली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा संघ निळ्या जर्सीमध्येच उतरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -