घरक्रीडाखून मे तेरे मिट्टी! क्रिकेटपटूंच्या शाळांमधली माती लंडनला रवाना!

खून मे तेरे मिट्टी! क्रिकेटपटूंच्या शाळांमधली माती लंडनला रवाना!

Subscribe

क्रिकेट वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढावा यासाठी त्यांना त्यांच्या घरच्या मैदानावरची माती पाठवण्यात येत आहे.

‘क्रिकेट’ हा भारतीयांसाठी धर्म आहे’, असं म्हणतात. भारताच्या प्रत्येक क्रिकेट सामन्यादरम्यान त्याचा प्रत्यय येतो. आणि हे क्रिकेट सामने जर वर्ल्डकपचे असतील, तर मग विचारताच सोय नाही! सध्या लंडनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी चांगली कामगिरी करावी, यासाठी स्टार स्पोर्ट्सने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढावा यासाठी त्यांना त्यांच्या त्यांच्या घरच्या मैदानावरची, घराजवळची किंवा शाळेच्या मैदानावरची माती पाठवली जात आहे. अशा प्रकारे खेळाडूंना प्रेरणा देण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

स्टार स्पोर्ट्सने आपल्या या उपक्रमांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यामध्ये प्रत्येक खेळाडूच्या नावाने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सर्वात आधी भारताचा कप्तान विराट कोहली याला शुभेच्छा देताना त्याच्या उत्तम नगरमधल्या विशार भारती पब्लिक स्कूलमधल्या मैदानावरची माती पाठवण्यात आली आहे.

- Advertisement -

भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनी याला त्याच्या शाळेतल्या मैदानातली माती पाठवण्यात आली आहे. हे तेच मैदान आहे, जिथे धोनीने त्याचा प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉट शोधून काढला!

- Advertisement -

भारताच्या बॉलिंगची मदार असणाऱ्या जसप्रीत बुमराहला देखील त्याच्या शाळेतल्या मैदानावरची माती पाठवण्यात येत आहे. याच मैदानावर जसप्रीत बुमराहने त्याचे बॉलिंगमधले पहिले धडे गिरवले होते.

भारतीय बॅटिंग लाइनअपममध्ये मधल्या फळीत खेळणारा धडाकेबाज ऑलराऊंडर हार्दिक पंड्याला त्याच्या घरच्या मैदानावरची माती पाठवली जात आहे.

सलमान खानच्या सुलतान चित्रपटामध्ये टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी सुलतान त्याच्या गावातल्या आखाड्यातली माती घेऊन जातो आणि शेवटच्या मॅचच्या आधी ती माती हातावर चोळतो. तसंच काहीसं फिल्मी फिलींग ही माती हातात घेतल्यानंतर भारतीय खेळाडूंना देखील येऊ शकतं असं म्हणता येईल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -