घरक्रीडाजयपूरमध्ये आला 'मेणाचा' धोनी

जयपूरमध्ये आला ‘मेणाचा’ धोनी

Subscribe

महेंद्रसिंग धोनीचे जयपूरमधील चाहते त्याच्या या मेणाच्या पुतळ्याला आवर्जून भेट देतील यात काहीच शंका नाही.

इंडियन क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं वास्तव्य यापुढे आता जयपूरमध्येही असणार आहे. जयपूरच्या वॅक्स म्युझिअमध्ये ‘माही’च्या मेण्याच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. सोमवारी (आज) सकाळी जयपूरमधील प्रसिद्ध वॅक्स म्युझिअमध्ये धोनीच्या मेण्याच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. आद जयपूरच्या वॅक्स म्युझिअमला २ वर्षे पूर्ण झाली. गेल्या अनेक दिवसांपासून पर्यटक आणि स्थानिकांकडून या म्युझिअममध्ये धोनीचाही एक पुतळा असावा अशी मागणी करण्यात येत होती. धोनी फॅन्सकडूनही या मागणीला वेळोवेळा पाठिंबा दर्शविण्यात आला. अखेर म्युझिअम प्रशासनाने या मागणीचा विचार करत धोनीचाही मेणाचा पुतळा तयार करण्याचा निर्णय घेतला. आज अखेर म्युझिअमच्या दुसऱ्या अॅनिव्हर्सरीचं निमित्त साधत या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. म्युझिअममध्ये असलेल्या सचिन तेंडुलकराच्या पुतळ्याशेजारी धोनीचा हा पुतळा ठेवण्यात आला आहे.  धोनीचे चाहते आणि त्याच्या वॅक्स स्टॅच्यूची मागणी करणारे लोक यामुळे सुखावले असणार हे नक्की. धोनीचे जयपूरमधील चाहते त्याच्या या मेणाच्या पुतळ्याला आवर्जून भेट देतील यात काहीच शंका नाही.

जयपूर वॅक्स म्युझिअमचे डायरेक्टर अनुप श्रीवास्तव एका मुलाखतीत याविषयी बोलताना म्हणाले की, या वॅक्स म्युझिअमच्या माध्यमातून केवळ लोकांचं मनोरंजन करणं एवढाच आमचा उद्देश नाही. मनोरंजंनासोबतच पर्यटकांना चांगली व्यक्तींची प्रेरण देणं हाही आमचा हेतू आहे. सचिन तेंडुलकर असो वा महेंद्रसिंग धोनी हे दोन्ही खेळाडू क्रिकेट क्षेत्रातील दोन मोठे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यामुळेच आमच्या वॅक्स म्युझिअममध्ये आम्ही त्यांचे पुतळे उभारले आहेत.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -