घरक्रीडा'त्या'ने ठेवली रिसॉर्टमध्ये तब्बल १६ लाखाची टीप

‘त्या’ने ठेवली रिसॉर्टमध्ये तब्बल १६ लाखाची टीप

Subscribe

फुटबॉलचा विश्वचषक नुकताच संपला असून फुटबॉल आणि फुटबॉलमधील खेळाडूंसंबधित बऱ्याच गोष्टी सतत समोर येत असतात. त्यातच आता एका खेळाडूने एका रिसॉर्टमध्ये तब्बल १६ लाखांची टिप ठेवून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे!

आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी हॉटेलमध्ये जेवायला गेलेला असतो. यावेळी जेवण झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार किंवा इच्छेनुसार वेटरसाठी टिप म्हणून पैसे ठेवत असतो. मग ते ५ रुपये असो, १० रुपये असो, ५० रुपये असो किंवा मग कुणी अगदी १०० रुपयेही ठेवत असेल. मात्र, अशी एक व्यक्ती आहे, जिने टिप म्हणून एका रिसॉर्टमध्ये तब्बल १६ लाख रुपये दिले आहेत. आधीच चर्चेत असलेली ही व्यक्ती आता या नव्या गोष्टीमुळे अजूनच चर्चेत आली आहे. आम्ही सांगतोय ते पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोबद्दल. आणि १६ लाखांची टिप स्विकारणारं हे आलिशान रिसॉर्ट आहे ग्रीसमधलं कोस्टा नावारिनो रिसॉर्ट!

फिफा वर्ल्डकपमधून पोर्तुगाल बाद फेरीमधूनच बाहेर पडलं. मात्र, त्यानंतर लगेचच रोनाल्डोने रिअल माद्रिदला गुडबाय करत जुवेंटस क्लबकडून खेळण्यासाठी करार केला. नव्या कराराचं सेलिब्रेशन करण्यासाठीत बहुतेक रोनाल्डो त्याच्या कुटुंब आणि मित्रपरिवारासह ग्रीसच्या कोस्टा नावारिनो रिसॉर्टमध्ये पोहोचला. या रिसॉर्टमध्ये त्याने भरपूर एन्जॉय केलं. आणि निघताना रिसॉर्टच्या सर्व्हिसवर खूश होत त्याने टिप ठेवली. चेक स्वरूपात रोनाल्डोने या रिसॉर्टमध्ये टिप ठेवली. रिसॉर्टमधील लोकांनी जेव्हा या चेकवरचा आकडा पाहिला, तेव्हा त्यांचे डोळेच फिरले! कारण भारतीय चलनात या टिपवरची रक्कम होती तब्बल १६ लाख!

- Advertisement -

रोनाल्डोने आपले कुटुंब आणि मित्रापरिवारासोबत रिसॉर्टमध्ये सुट्टी घालवल्यानंतर रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेवर खूश होऊन तब्बल १७,८५० युरोस म्हणजेच भारतीय चलनानुसार १६ लाख रुपयाचा चेक टीप म्हणून ठेवला. रोनाल्डोच्या या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत असून, यात रोनाल्डो आपल्या आई, पत्नी आणि मुलासोबत दिसत आहे. रोनाल्डोचे हे फोटो त्याच्या आणि पत्नी जॉर्जिनाच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळत आहेत.

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on

Lovely moments!??

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on

- Advertisement -

? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ☀?❤

A post shared by Georgina Rodríguez (@georginagio) on

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात स्पेनविरूद्ध हॅट्रीक नोंदविणाऱ्या रोनाल्डोने १० जुलै २०१८ रोजी रिअल माद्रिद क्लब सोडत जुवेंटस या इटालियन क्लबमध्ये प्रवेश केला. त्याने जुवेंटसशी जवळपास ८०० कोटींचा करार केला असून त्याचे आता वर्षाला साधारण २०० कोटी इतके उत्पन्न आहे.

cristiano-ronaldo-juventus-
ख्रिस्तियानो रोनाल्डो

रोनाल्डो नेहमीच आपल्या वेगवेगळ्या गोष्टीमुंळे चर्चेत असतो. कधी आपल्या हेअर स्टाईलसाठी तर कधी आपल्या मॅच सेलिब्रेशनसाठी. यावेळी रोनाल्डो रिसॉर्टमध्ये ठेवलेल्या १६ लाखांच्या टिपमुळे तो चर्चेत आला असून आता तो आपल्या नवीन क्लब जुवेंटसकडून कशी कामगिरी करतो, याची त्याच्या चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -