घरक्रीडाइंग्लंडला मात देत क्रोएशिया अंतिम फेरीत

इंग्लंडला मात देत क्रोएशिया अंतिम फेरीत

Subscribe

अतिरिक्त वेळेत इंग्लंडला २-१ ने नमवत क्रोएशिया पहिल्यांदाच फायनलमध्ये, फायनलमध्ये क्रोएशियासमोर फ्रान्सचे आव्हान.

फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये क्रोएशियाने इंग्लंडला २-१ च्या फरकाने पराभूत करत फायनलमध्ये झेप घेतली आहे. सामन्याची ९० मिनिटं पूर्ण झाली तरी स्कोर १-१ असा होता. त्यामुळे दोन्ही संघांना ३० मिनिट अतिरिक्त वेळ देण्यात आला. ज्यात १०९ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या मारियो मँजुकिच ने अप्रतिम गोल करत सामन्यात क्रोएशियाला विजय मिळवून दिला. आता क्रोएशियासमोर १५ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात फ्रान्सचे आव्हान समोर असणार आहे.

सामना सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक पद्धतीने खेळला जात होता. इंग्लंडकडून ट्रीपीयरने अगदी सुरूवातीलाच सामन्याच्या ५व्या मिनिटाला फ्री किकच्या मदतीने गोल करत सामन्यात इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्याच्या हाफ टाईमपर्यंत १-० असाच स्कोर राहिला. त्यानंतर सामन्याच्या उत्तरार्धात क्रोएशियाने आक्रमक खेळ सुरू करतच सामन्याच्या ६८व्या मिनिटाला गोल केला. क्रोएशियाच्या पेरिसीचने अप्रतिम गोल करत संघाला सामन्यात बरोबरी साधून दिली. त्यानंतर सामन्याची ९० मिनिटं पूर्ण होई पर्यंत एकही गोल झाला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. ज्यात १०९व्या मिनिटाला क्रोएशियाकडून मारियो मँजुकिचने जबरदस्त गोल करत क्रोएशियाला २-१ ची आघाडी मिळवून दिली. सामना संपेपर्यंत क्रोएशियाने ही आघाडी कायम ठेवली आणि सामन्यात २-१ ने विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली.

- Advertisement -
Mario Mandzukic
मारियो मँजुकिच

पहिल्या सेमी फायनलमध्ये बेल्जियमला १-० ने मात देत फायनलमध्ये पोहोचलेल्या फ्रान्सचे आव्हान आता क्रोएशियासमोर असणार आहे. १५ जुलैला फ्रान्सविरूद्ध क्रोएशिया असा अंतिम सामना रंगणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -