घरक्रीडालिव्हरपूल जेतेपदाच्या उंबरठ्यावर

लिव्हरपूल जेतेपदाच्या उंबरठ्यावर

Subscribe

क्रिस्टल पॅलेस संघावर ४-० अशी मात

लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात क्रिस्टल पॅलेसवर ४-० अशी मात केली. या विजयामुळे लिव्हरपूलचा संघ ही स्पर्धा जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्यांनी १९९० नंतर इंग्लंडमधील स्थानिक स्पर्धा जिंकलेली नाही. गतविजेत्या मँचेस्टर सिटीला गुरुवारी रात्रीचा चेल्सीविरुद्धचा सामना जिंकण्यास अपयश आल्यास लिव्हरपूल या स्पर्धेचे जेतेपद पटकावेल. अन्यथा लिव्हरपूलचा पुढील सामना २ जुलैला मँचेस्टर सिटीविरुद्धच होणार आहे. हा सामना जिंकल्यास किंवा बरोबरीत संपल्यास ते प्रीमियर लीगच्या चषकावर आपले नाव कोरतील.

बुधवारी रात्री झालेल्या क्रिस्टल पॅलेसविरुद्धच्या सामन्यात लिव्हरपूलने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. २३ व्या मिनिटाला त्यांना फ्री-किक मिळाली. यावर ट्रेंट अलेक्झांडर-अर्नोल्डने गोल करत लिव्हरपूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यांनी पुढेही आपला आक्रमक खेळ सुरु ठेवला.

- Advertisement -

४४ व्या मिनिटाला स्टार खेळाडू मो सलाहने लिव्हरपूलची आघाडी दुप्पट केली. उत्तरार्धात फॅबिनियो आणि साडियो माने यांनी केलेल्या गोलमुळे लिव्हरपूलने हा सामना ४-० असा जिंकला. हा त्यांचा ३१ सामन्यांतील तब्बल २८ वा विजय होता, तर त्यांनी संपूर्ण मोसमात केवळ एक सामना गमावला आहे. क्रिस्टल पॅलेसचा हा ३१ सामन्यांत ११ वा पराभव होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -