दहिसर मिनिथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न

विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर हायस्कूलला सांघिक जेतेपद

Mumbai
१४ वर्षांखालील मुले गटातील विजेता जय मोंडे

दहिसर स्पोर्ट्स असोसिएशन आणि व्ही.पी.एम स्पोर्ट्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने कॉसमॉस परेरा यांच्या स्मरणार्थ नुकतीच २२ वी दहिसर मिनिथॉन स्पर्धा पार पडली. दहिसर ते कांदिवली परिसरातील २० हून अधिक शाळांच्या १००० धावपटूंनी या मिनिथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवला होता.

दहिसरच्या विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर हायस्कूलच्या धावपटूंनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत २५७ गुणांसह सांघिक जेतेपद पटकावले. त्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिदानंद शेट्टी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्याभूषण हायस्कूलने ५२ गुणांसह सांघिक उपविजेतेपद, तर सेंट जॉन हायस्कूलने ५२ गुणांसह द्वितीय उपविजेतेपदाचा मान मिळवला.

निकाल – [प्रथम क्रमांक]
१० वर्षांखालील मुली – १ किमी : प्राप्ती शेट्टी (व्ही.पी.एम स्पोर्ट्स क्लब)
१२ वर्षांखालील मुली – २ किमी : श्रेया पाटील (व्ही.पी.एम स्पोर्ट्स क्लब)
१४ वर्षांखालील मुली – ३ किमी : बिंदू पासूल्ला (रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब)
१६ वर्षांखालील मुली – ३ किमी : रिषिक शेट्टी (व्ही.पी.एम स्पोर्ट्स क्लब)
१० वर्षांखालील मुले – १ किमी : अथर्व जाधव (व्ही.पी.एम विद्यामंदिर हायस्कूल)
१२ वर्षांखालील मुले – २ किमी : रमण दमाणी (व्ही.पी.एम स्पोर्ट्स क्लब)
१४ वर्षांखालील मुले – ३ किमी : जय मोंडे (व्ही.पी.एम विद्यामंदिर हायस्कूल)
१६ वर्षांखालील मुले – ५ किमी : विनायक निनावे (व्ही.पी.एम विद्यामंदिर हायस्कूल)