Video : अक्षयच्या ‘बाला ओ बाला’ गाण्यावर वॉर्नरचा भन्नाट डान्स

अक्षय कुमारच्या सुपरहिट 'बाला ओ बाला' या गाण्यावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर जबरदस्त डान्स केला आहे.

Mumbai
david warner dancing video on akshay kumar housefull 4 movie song
अक्षयच्या 'बाला ओ बाला' गाण्यावर वॉर्नरचा भन्नाट डान्स

कोरोना व्हायरसमुळे सध्या क्रिकेटर देखील आपआपल्या घरात बंद आहेत. पण, सोशल मीडियावर मात्र, क्रिकेटर चांगलेच active झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कित्येक जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर देखील मागे नाही. वॉर्नरने अक्षय कुमारच्या सुपरहिट ‘बाला ओ बाला’ या गाण्यावर डान्स केल्याचे समोर आले आहे. वॉर्नरनेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

या व्हिडीओमध्ये वॉर्नर हा सूट घालून आलेला दिसत आहे. वॉर्नरचा हा टिपटॉप लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अक्षय कुमारने जसा गाण्यावर डान्स केला होता, तसाच डान्स वॉर्नरने या व्हिडीओमध्ये केलेला आहे. या गाण्यावरचा अक्षयचा डान्स चांगलाच हिट झाला होता. आता वॉर्नरचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतो का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

हाऊसफुल्ल चित्रपटातील डान्स

हाऊसफुल्ल हा सिनेमा चांगलाच गाजला होता. त्यामुळे त्याचे चार भाग करण्यात आले. हाऊसफुल्लच्या चौथ्या भागात अक्षय कुमारचे ‘बाला ओ बाला’ हे गाणे चांगलेच हिट झाले होते. हे गाणे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्याच पसंतीस उतरले आहे. तसेच आता या गाण्यावर वॉर्नरने देखील जबरदस्त डान्स केल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – ‘घुमकेतू चित्रपट करताना बॉलीवूडमधील स्ट्रगलचे दिवस आठवले’