घरIPL 2020DC vs RR: मराठमोळा देशपांडे चमकला; दिल्लीचा राजस्थानवर विजय

DC vs RR: मराठमोळा देशपांडे चमकला; दिल्लीचा राजस्थानवर विजय

Subscribe

दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानला पराभूत करत गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे. दिल्लीच्या १६२ धावांचक पाठलाग करताना राजस्थानने २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १४८ धावा केल्या आणि हा सामना १३ धावांनी गमावला. दिल्लीने गोलंदाजांच्या जोरावर राजस्थानला पराभूत केलं.

दिल्लीच्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर जोस बटलर आणि बेन स्टोक्स सुरुवातीपासून फटकेबाजी करायला सुरुवात केली. मात्र, तिसऱ्याच षटकात बटलरच्या स्वरूपात राजस्थानला पहिला धक्का बसला. बटलरने ९ चेंडूत २२ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ केवळ १ धावा करून तंबूत परतला. बटलर आणि स्टिव्ह स्मिथ लागोपाठ माघारी परतल्यानंतर बेन स्टोक्सने संजू सॅमसनच्या साथीने संघाचा डाव सावरला. स्टोक्सने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३५ चेंडूत ६ चौकार लगावत ४१ धावा केल्या. स्टोक्स आणि सॅमसनची जोडी मैदानात जम बसवते आहे असं वाटत असतानाच दिल्लीचा बदली कर्णधार शिखर धवनने तुषार देशपांडेच्या हातात चेंडू सोपवला. तुषारनेही आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत बेन स्टोक्सला बाद केलं. स्टोक्स बाद झाल्यानंतर दिल्ली पुन्हा एकदा सामन्यात परतली. राजस्थानने २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १४८ धावाच केल्या. दिल्लीकडून नोर्टजे आणि देशपांडे यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

- Advertisement -

नाणेफेक जिंकत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र राजस्थानच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून प्रभावी मारा करत दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. दिल्लीच्या डावाची सुरुवातच खराब झाली. जोफ्रा आर्चरने पृथ्वी शॉचा त्रिफळा उडवला. पहिल्याच चेंडूवर महत्वाचा फलंदाज माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेला डाव सावरण्याची संधी होती. मात्र आर्चरच्या गोलंदाजीवर रहाणेने खराब फटका खेळत झेलबाद झाला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर शिखर धवन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. शिखरने एक बाजू लावून धरत संघाला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. शिखरने ३३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरही अर्धशतक झळकावलं. त्याने ५३ धावांची खेळी केली. अय्यर आणि धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानला १६२ धावांचं आव्हान दिलं. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने ३, जयदेव उनाडकटने २ तर कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -