घरक्रीडाIPL : दीपक चहरची सरावाला सुरुवात

IPL : दीपक चहरची सरावाला सुरुवात

Subscribe

चहर हा चेन्नईचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे.   

आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) गोलंदाज दीपक चहर आता नेट्समध्ये सराव करू शकणार आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे चहरला संघातील सहकाऱ्यांपासून काही काळ दूर क्वारंटाईनमध्ये राहावे लागले होते. मात्र, त्यानंतर त्याचे दोन कोरोना चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. बीसीसीआयच्या नियमांनुसार, त्याची कार्डिओ-वॅस्क्यूलर चाचणीही करण्यात आली. आता तो पूर्णपणे बरा झाल्याने बीसीसीआयने त्याला चेन्नईच्या इतर खेळाडूंसोबत सराव करण्याची परवानगी दिली आहे.

बीसीसीआयकडून परवानगी मिळाली

‘संघातील इतर खेळाडूंसोबत सराव करण्यासाठी चहरला बीसीसीआयकडून आवश्यक ती परवानगी मिळाली आहे. आमचा संघ खूप मेहनत घेत आहे आणि कसून सराव करत आहे. आमचे खेळाडू सलामीच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत,’ असे चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन शुक्रवारी म्हणाले. मागील वर्षीच्या उपविजेत्या चेन्नईसमोर यंदा १९ सप्टेंबरला होणाऱ्या सलामीच्या लढतीत गतविजेत्या मुंबईचे आव्हान असणार आहे.

- Advertisement -

चेन्नईचा आत्मविश्वास वाढेल

चहर हा चेन्नईचा प्रमुख वेगवान गोलंदाज असून मागील मोसमात त्याने १७ सामन्यांत २२ विकेट घेतल्या होत्या. त्याच्या पुनरागमनामुळे चेन्नईच्या संघाचा आत्मविश्वास वाढेल. सुरेश रैना आणि हरभजन सिंग हे चेन्नईचे प्रमुख खेळाडू यंदाच्या मोसमात खेळणार नाहीत. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंना संधी मिळेल आणि ते या संधीचे सोने करतील असा विश्वनाथन यांना विश्वास आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -