धोनीला सचिन, सेहवाग आणि गंभीर संघात नको होते

गंभीरचा मोठा खुलासा

Mumbai
सचिन, सेहवाग आणि गंभीर

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या सर्व ठिकाणी होताना दिसत आहेत. पण जेव्हा धोनी कर्णधार होता, तेव्हा त्याने संघात मोठे बदल केले होते. आता तर एक मोठा खुलासा पुढे आला आहे. धोनीला आपल्या संघात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सेहवाग आणि गौतम गंभीर नको होते, हा मोठा खुलासा दस्तुरखुद्द गंभीरनेच केला आहे.

भारतीय संघ २०१२ साली ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर होता. त्यावेळी धोनीला भारताच्या अंतिम अकरा जणांच्या संघात सचिन, सेहवाग आणि गंभीर नको होते. या तिघांचेही क्षेत्ररक्षण चांगले नाही, अशी सबब धोनीने दिली होती.

याबाबत गंभीरने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ” धोनीला मी, सचिन आणि सेहवाग एकत्र भारताच्या संघात नको होतो. आमचे क्षेत्ररक्षण चांगले नाही, असे कारण धोनीने दिले होते. माझ्यासाठी हा सर्वात मोठा धक्का होता.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here