धोनीच मार्गदाता

ऋषभ पंतकडून स्पष्टीकरण

Mumbai
Pant-Dhoni

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनीच्या खेळीवरून त्याच्या मोठ्या प्रमाणात टीका झाली.तो निवृत्ती कधी होणार अशा चर्चांनी जोर धरला. परंतु,धोनीने आपल्या निवृत्तीविषयी अधिकृत वक्तव्य केलेले नसले तरीही निवड समितीने यापुढील मालिकांमध्ये ऋषभ पंत हा भारतीय संघात पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल हे जाहीर केले.

धोनी आणि ऋषभ पंत यांच्यात सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये अनेकदा तुलना होत असते. मात्र धोनी हा आपला मार्गदर्शक असून मी त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो हे ऋषभ पंतने एका मुलाखती दरम्यान सस्पष्ट केले आहे. माझ्याही मनात धोनीविषयी होणार्‍या तुलनेचा विचार येतो, पण हे खूप कठीण आहे. मी लगेचच त्याच्यासारखा खेळाडू बनेन असा विचार करणे चुकीचे आहे. धोनी माझा मार्गदर्शक आहे, मी नेहमी त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, मात्र मैदानात उतरण्याआधी मी त्या गोष्टींचा कसा अवलंब करतो हे माझ्यासाठी महत्वाचे आहे,असे पंत म्हणाला.

मी नेहमी सोप्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक सामन्यात माझ्याकडून चांगला खेळ कसा होईल हा एकच विचार मनात असतो,असे ही तो म्हणाला.