घरक्रीडाधोनी बर्‍याचदा चुकीचे सल्ले देतो

धोनी बर्‍याचदा चुकीचे सल्ले देतो

Subscribe

कुलदीप यादव

भारताला २०११ विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या भारतीय संघाचे नेतृत्त्व करत नाही. मात्र, अजूनही त्याच्या नेतृत्त्वात आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघ अप्रतिम कामगिरी करत असतो. तसेच सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला तो वेळोवेळी मार्गदर्शन करताना दिसतो आणि यष्टीमागून तो गोलंदाजांनाही सल्ले देत असतो. त्याच्या सल्ल्यांचा खासकरून युवा गोलंदाजांना बराच फायदा होताना पहायला मिळते. मात्र, धोनी बर्‍याचदा चुकीचेही सल्ले देतो, असे वक्तव्य भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने केले आहे.

धोनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतो. मात्र, तो बर्‍याचदा चुकीचे सल्लेही देतो, पण आम्ही त्याला याबाबत काही बोलू शकत नाही. तो सामन्यादरम्यान खूप बोलत नाही. दोन षटकांमध्ये जेव्हा वेळ असतो, तेव्हाच तो आमच्याजवळ येऊन आम्हाला काही गोष्टी सांगतो, असे कुलदीप म्हणाला.

- Advertisement -

आता धोनी आणि कुलदीप हे लवकरच पुन्हा भारतीय संघातून एकत्र खेळताना दिसणार आहेत. ३० मेपासून क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार असून, भारताला ही स्पर्धा जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. मागील रविवारी संपलेल्या आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई संघाने अंतिम फेरी गाठली होती, तर कुलदीप यादवच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला बाद फेरीही गाठता आली नाही. त्यातच त्यालाही या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करता आले नाही. ९ सामन्यांत अवघ्या ४ विकेट घेता आल्याने त्याला संघातून वगळण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -