धोनी पुन्हा येतोय !

मदत सामन्यासाठी खेळणार

Mumbai

2019च्या विश्वचषकानंतर महेंद्र सिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. धोनीने गेल्या वर्षी जुलैमध्ये आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. त्या सामन्यात धोनीने अर्धशतक केले होते पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला होता. धोनी मैदानावर कधी दिसणार याबद्दल त्याच्या चाहत्यांना उत्सुकता होती. धोनीच्या चाहत्यांना लवकरच तो मैदानावर दिसणार आहे.

ऑस्ट्रेलियातील जंगलात काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. या आगीत हजारो प्राण्यांना जीव गमवावा लागला. हजारो प्राणी जखमी झालेत. तर, अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये आग पीडितांच्या मदतीसाठी एका सामन्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात क्रिकेटमधून निवृत्त झालेले दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंह धोनी देखील खेळण्याची शक्यता आहे.

मदतनिधीसाठीचा सामना ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या संघाचे नेतृत्व रिकी पॉन्टिंग करणार असून दुसर्‍या संघाचे नेतृत्व शेन वॉर्न करणार आहे. ब्रेट ली, जस्टिन लँगर, मायकल क्लार्क, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, शेन वॉटसन आणि अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल हे खेळाडू देखील या सामन्यात खेळणार आहेत. मदतनिधी सामन्यातून जमा होणारी रक्कम ऑस्ट्रेलिया रेड क्रॉस संघटनेला दिली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here