..तर धोनी लवकरच निवृत्त होईल

 प्रशिक्षक रवी शास्त्रींचे सूचक विधान

Mumbai
Ravi Shashtri
रवी शास्त्री

महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती कधी स्विकारणार या प्रश्नावर गेले अनेक महिने चर्चा सुरू आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर, धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. अशातच संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल महत्वाचे विधान केले आहे.

आगामी आयपीएलचा हंगाम हा धोनीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या हंगामात त्याला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले तर तो निवृत्ती घेऊ शकतो, असे संकेत शास्त्री यांनी दिले आहेत. धोनी स्वतःला चांगले जाणून आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतानाही आपण १०० सामने खेळावेत हा विचार त्याने केला नाही. कुठे थांबायचे हे त्याला माहिती आहे. त्याने सरावाला सुरुवात केली आहे की नाही याची मला कल्पना नाही. पण आयपीएलनंतर चित्र स्पष्ट होईल. जर त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही तर तो थँक्यू व्हेरी मच म्हणेल, एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री बोलत होते.