घरक्रीडामला निवृत्तीच्या योजना विचारलेल्या का?

मला निवृत्तीच्या योजना विचारलेल्या का?

Subscribe

इंग्लंडमध्ये झालेला क्रिकेट विश्वचषक जिंकण्यात भारतीय संघाला अपयश आले. त्यांचा उपांत्य फेरीत न्यूझीलंडने पराभव केल्यामुळे तिसर्‍यांदा विश्वविजेते होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. भारताने हा विश्वचषक जिंकल्यास या संघातील अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी निवृत्त होईल, अशी चर्चा होती. मात्र, भारताने हा विश्वचषक जिंकला नाही आणि धोनीने अजून निवृत्ती घेतलेली नाही.

भारत यानंतर वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर जाणार असून त्यासाठी भारतीय संघाची निवड १९ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे जर धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतला नाही, तर त्याची संघात निवड होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही धोनीच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे. त्याच्या मते निवड समितीने धोनीशी चर्चा करून त्याचा निर्णय जाणून घेतला पाहिजे, जे त्याच्याबाबत झाले नाही.

- Advertisement -

महेंद्रसिंग धोनीने निवृत्त झाले पाहिजे की नाही, हा निर्णय त्याने स्वतः घेतला पाहिजे. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका त्याची अखेरची मालिका असणार का आणि तो या मालिकेनंतर निवृत्त होणार का, हा निर्णय त्यानेच घ्यायला हवा. तो जर यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करत असेल, तर त्याची संघात निवड होईल, अन्यथा त्याला निवड समितीने आम्ही तुला यापुढे भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून पाहत नाही, हे सांगितले पाहिजे. निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद यांनी त्याच्याशी चर्चा केली पाहिजे. जे माझ्याबाबतीत झाले नाही. मला जर निवृत्तीबाबत निवड समितीने विचारले असते, तर मी माझ्या योजना त्यांना सांगितल्या असत्या, असे सेहवाग म्हणाला.

सेहवागला भारतीय संघातून वगळण्यात आले, त्यावेळी संदीप पाटील निवड समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी निवड समितीचे सदस्य असणार्‍या विक्रम राठोड यांना सेहवागशी चर्चा करायला सांगितली होती. याबाबत सेहवाग म्हणाला, संघातून वगळल्यानंतर चर्चा करून काय फायदा? धोनीला संघातून वगळल्यानंतर त्याच्याशी एम.एस.के प्रसाद यांनी निवृत्तीबाबत चर्चा केली, तर धोनी काय उत्तर देणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -