घरक्रीडाआंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर पुन्हा स्थानिक क्रिकेट खेळणे अवघड!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर पुन्हा स्थानिक क्रिकेट खेळणे अवघड!

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर पुन्हा स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणे अवघड असते, असे मत भारताचा सलामीवीर मुरली विजयने व्यक्त केले. विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६१ कसोटी, १७ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, कामगिरीत सातत्याचा अभाव असल्याने त्याला मागील वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय संघातून वगळण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला स्थानिक क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळावे लागत आहे. सध्या रणजी करंडकात तामिळनाडूचा सामना बलाढ्य कर्नाटकाशी होत असून या सामन्याच्या पहिल्या डावात विजयने ३२ धावांची खेळी केली.

तुम्ही सर्वोच्च स्तरावर (आंतरराष्ट्रीय क्रिकेट) चांगली कामगिरी करु शकता हे माहित असताना तुम्हाला स्थानिक क्रिकेट खेळावे लागते, ही गोष्ट स्वीकारणे अवघड जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्यानंतर पुन्हा स्थानिक क्रिकेट खेळणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नसते, असे विजय म्हणाला.

- Advertisement -

विजयला अजूनही भारतीय संघात पुनरागमनाची आशा आहे. मात्र, राष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर त्याला भारत ’अ’ संघाकडून किंवा दुलीप करंडकात एखाद्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. याविषयी त्याने सांगितले, मला बर्‍याच काळापासून कोणत्याही संघात संधी मिळालेली नाही. राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलेल्या खेळाडूंना पुनरागमनासाठी योग्य संधी मिळाली पाहिजे. खेळाडूला संघातून बाहेर काढल्यानंतर त्याचा विचारत केला जात नाही, असे होता कामा नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -