घरक्रीडादिनेश कार्तिक ने मागितली माफी

दिनेश कार्तिक ने मागितली माफी

Subscribe

दिनेश कार्तिककडून बीसीसीआयची माफी

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या केंद्रिय कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी, बीसीसीआयची बिनशर्त माफी मागितली आहे. कार्तिकने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये शाहरुख खानच्या त्रिनबागो नाइट रायडर्सच्या ड्रेसिंग रुममध्ये हजेरी लावली होती.कार्तिकने केलेले कृत्य हे बीसीसीआयच्या नियमानुसार कराराचे उल्लंघन करणारे आहे. यामुळे कार्तिकला बीसीसीआयची माफी मागावी लागली.

मी प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅक्युलमच्या विनंतीवरून पोर्ट ऑफ स्पेनला गेलो होतो. मॅक्युलमच्या सांगण्यावरुनच मी टीकेआरची जर्सी घातली. मला यासाठी बीसीसीआयची परवानगी घ्यायला हवी होती. मात्र, मी ती घेतली नाही, यामुळे मी बीसीसीआयची बिनशर्त माफी मागतो,असे कार्तिकने आपल्या उत्तरात म्हटले आहे. त्रिनबागो नाइट रायडर्सच्या जर्सीत कार्तिक दिसला होता. यावर बीसीसीआयने कार्तिकला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.या प्रकारानंतर मी इतर कोणत्याही सामन्यात टीकेआरच्या ड्रेसिंग रुममध्ये जाणार नाही,असेही कार्तिकने माफीनाम्यात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -