घरक्रीडादेवधर चषकात कार्तिक, अय्यर, रहाणेला कर्णधारपद

देवधर चषकात कार्तिक, अय्यर, रहाणेला कर्णधारपद

Subscribe

देवधर चषकासाठी गुरूवारी संघांची घोषणा करण्यात आली. यावर्षी देवधर चषकात विजय हजारे चषक जिंकणाऱ्या संघाचा समावेश नसेल.

२३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या देवधर चषकासाठी गुरूवारी संघांची घोषणा करण्यात आली. यावर्षी देवधर चषकात विजय हजारे चषक जिंकणाऱ्या संघाचा समावेश नसेल. त्याऐवजी ही स्पर्धा भारत अ, ब आणि क या संघांत होईल. या स्पर्धेमध्ये दिनेश कार्तिक भारत ‘अ’ संघाचे, श्रेयस अय्यर भारत ‘ब’ संघाचे आणि अजिंक्य रहाणे भारत ‘क’ संघाचे नेतृत्व करणार आहे.

या स्पर्धेत अश्विनही खेळणार

या स्पर्धेत भारतीय कसोटी संघातील प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विनही खेळणार आहे. अश्विन आणि नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा युवा फलंदाज पृथ्वी शॉ यांचा भारत ‘अ’ संघात समावेश आहे. ही स्पर्धा रहाणे आणि अश्विन यांच्यासाठी महत्वाची ठरू शकते. या दोघांना मागील काही काळात भारतीय एकदिवसीय संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे हे दोघे या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करून भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन करण्यास उत्सुक असतील. त्याचप्रमाणे श्रेयस अय्यर, मयांक अगरवाल, शुभमन गिल, मोहम्मद सिराज यासारख्या युवा खेळाडूंच्या प्रदर्शनावरही निवड समितीची नजर असेल.

देवधर चषकासाठी संघ पुढीलप्रमाणे – 

 
भारत अ : दिनेश कार्तिक (कर्णधार), पृथ्वी शॉ, अनमोलप्रीत सिंह, अभिमन्यु इश्वरन, अंकित बावणे, नितीश राणा, करुण नायर, कृणाल पांड्या, रविचंद्रन आश्विन, श्रेयस गोपाल, शम्स मुलानी, मोहम्मद सिराज, धवल कुलकर्णी, सिद्धार्थ कौल
 
भारत ब : श्रेयस अय्यर (कर्णधार), मयांक अगरवाल, ऋतुराज गायकवाड, प्रशांत चोप्रा, हनुमा विहारी, मनोज तिवारी, अंकुश बेन्स, रोहित रायडू, कृष्णप्पा गौथम, मयांक मार्कंडे, शाहबाज नदीम, दिपक चहार, वरुण अॅरोन, जयदेव उनाडकट
 
भारत क : अजिंक्य रहाणे (कर्णधार), अभिनव मुकुंद, शुभमन गिल, रविकुमार समर्थ, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, इशान किशन, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहार, पप्पु रॉय, नवदीप सैनी, रजनीश गुरबानी, उमर नझीर  
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -