दिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार

दिनेश कार्तिकने आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिकला यंदाच्या आयपीएलमध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून फारसे यश मिळालेले नाही. त्याच्यावर बरीच टीकाही झाली आहे. त्यामुळे आता फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून कार्तिकने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन आयपीएलच्या उर्वरित सामन्यांत केकेआरचे नेतृत्व करेल. मॉर्गन हा वर्ल्डकप विजेता कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने २०१९ एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला होता.