घरक्रीडादिनेश कार्तिकचे कसोटी सामन्यात पुनरागमन

दिनेश कार्तिकचे कसोटी सामन्यात पुनरागमन

Subscribe

अफगाणिस्तान कसोटी सामन्यात वृद्धीमान साहाच्या जागी खेळण्याची संधी

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा नियमित यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धीमान साहा आयपीएल मधील सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याची जागा दिनेश कार्तिक घेणार असल्याचे बीसीसीआयने शनिवारी (२ जून) रोजी ट्विटरमार्फत जाहीर केले आहे. हा कसोटी सामना १४ जूनपासून बंगळुरू येथे सुरू होणार आहे.

- Advertisement -

तब्बल ८ वर्षानंतर खेळणार कसोटी सामना!

२००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिनेश कार्तिकने भारतीय कसोटी संघात पदार्पण केले होते. कार्तिकने २३ कसोटी सामन्यांमध्ये १००० धावा केल्या आहेत. यात एका शतकासह ७ अर्धशतकांचा समावेश आहे. दिनेश कार्तिकने त्याचा अखेरचा कसोटी सामना २०१० मध्ये बांगलादेशविरोधात खेळला होता.

दिनेश कार्तिक जबरदस्त फॉर्ममध्ये

बऱ्याच वर्षांनंतर दिनेश कार्तिक चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. निदाहास ट्रॉफीच्या फायनलमधील दिनेशच्या ८ बॉलमधील २९ धावांमुळे भारत विजयी झाला. त्याची ही खेळी संस्मरणीय ठरली. यानंतर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असताना देखील दिनेशची कामगिरी सरस ठरली. त्याने १६ सामन्यांत ४९८ धावा केल्या होत्या. त्याच्या या जबरदस्त फॉर्ममुळे त्याला कसोटी सामन्यात जागा मिळाली आहे.

- Advertisement -

वृद्धीमान साहावर उपचार

आयपीएलमधील दुसऱ्या उपांत्य सामन्यात शिवम मावीच्या बॉलमुळे साहाच्या उजव्या अंगठ्याला जखम झाली होती. सध्या सहाच्या दुखापतीवर बीसीसीआयचे फिजिओथेरपिस्ट उपचार करत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सहाला विश्रांती मिळावी आणि त्याची दुखापत पूर्ण बरी व्हावी म्हणून त्याला अफगाणिस्तानविरुद्ध खेळवण्यात येणार नसल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -