घरक्रीडासॅमसनने मानधन दिले मैदानातील कर्मचार्‍यांना

सॅमसनने मानधन दिले मैदानातील कर्मचार्‍यांना

Subscribe

भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ या संघांमधील ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच तिरुअनंतरपुरमच्या ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय मैदानावर पार पडली. या मालिकेत भारत ‘अ’ संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी ही मालिका ४-१ अशी खिशात घातली. या मालिकेतील सामन्यांमध्ये सतत पावसाचा व्यत्यय आला. मात्र, मैदानातील कर्मचार्‍यांनी बरीच मेहनत घेत सामने कमी षटकांचे तरी होतील हे निश्चित केले. त्यांच्या या मेहनतीमुळे भारत ‘अ’ संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने आपले मानधन मैदानातील कर्मचार्‍यांना दान करण्याचा निर्णय घेतला.

या मालिकेतील अखेरच्या सामन्यात सॅमसनने आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्याने अवघ्या ४८ चेंडूत ९१ धावा फटकावल्या. या कामगिरीमुळे त्यालासामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर अखेरच्या दोन सामन्यांसाठी मिळालेले मानधन सॅमसनने मैदानातील कर्मचार्‍यांना दान केले. सॅमसनला अखेरचे दोन सामने खेळण्यासाठी दीड लाखांचे मानधन मिळाले. ही मालिका व्यवस्थित पार पडली, याचे श्रेय मैदानातील कर्मचार्‍यांना मिळायलाच हवे. जर खेळपट्टीमध्ये जराशीही ओल राहिली असती तरी सामनाधिकार्‍यांनी खेळ होऊच दिला नसता. मैदानातील कर्मचार्‍यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करावे तितके कमी आहे. त्यामुळे मी माझे मानधन मैदानातील कर्मचार्‍यांना देण्याचे ठरवले आहे, असे सॅमसन म्हणाला. शिखर धवननेही मैदानातील कर्मचार्‍यांच्या कामाचे कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -