घरक्रीडाद्रविडने दिला नैसर्गिक खेळाचा सल्ला -गिल

द्रविडने दिला नैसर्गिक खेळाचा सल्ला -गिल

Subscribe

युवा फलंदाज शुभमन गिलने मागील काही काळात स्थानिक क्रिकेट, आयपीएल आणि भारत ’अ’ संघाकडून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र, असे असतानाही त्याची वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी निवड न झाल्याचे सौरव गांगुलीला आश्चर्य वाटले होते. तो त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. काही लोक त्याने संयमाने खेळले पाहिजे असेही म्हणतात. परंतु, भारताचा माजी कर्णधार आणि भारत ’अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला नेहमी नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला आहे.

राहुल सरांच्या मार्गदर्शनाखाली मी आधी १९ वर्षांखालील भारतीय संघात आणि मग भारत ’अ’ संघात खेळलो. त्यांनी मला एक सल्ला दिला आहे, जो मी कायम लक्षात ठेवतो. त्यांनी मला सांगितले आहे की, ’काहीही झाले तरी तू खेळण्याच्या पद्धतीत बदल करू नकोस. तू तुझा नैसर्गिक खेळ करत राहा. त्यामुळेच तुला इतके यश मिळाले आहे’, असे गिल म्हणाला.

- Advertisement -

गिलने काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिज ’अ’ संघाविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे पहिले द्विशतक झळकावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो सर्वात युवा भारतीय फलंदाज आहे. या खेळीबाबत तो म्हणाला, या सामन्याच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे आव्हानात्मक होते आणि आमचा संघ अडचणीत होता. त्यामुळे ती खेळी माझ्या सर्वोत्तम खेळींपैकी एक होती असे मला वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -