घरक्रीडामाझ्या प्रशिक्षकांचा द्रोणाचार्यसाठी विचार का झाला नाही?

माझ्या प्रशिक्षकांचा द्रोणाचार्यसाठी विचार का झाला नाही?

Subscribe

बॉक्सर अमित पंघालचा सवाल

नुकत्याच झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणार्‍या अमित पंघालने माझे प्रशिक्षक अनिल कुमार यांचा मानाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी का विचार झाला नाही असा सवाल उपस्थित केला आहे. भारतीय बॉक्सिंग महासंघाचा हा निर्णय अतिशय चुकीचा होता असे अमितचे मत आहे. भारतीय बॉक्सिंग महासंघाने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी संध्या गुरुंग आणि शिव सिंह यांची शिफारस केली आहे.

माझ्या प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस केली पाहिजे होती. मागील वर्षी या पुरस्कारासाठी त्यांचा विचार झाला नव्हता आणि यावेळी पुन्हा तेच झाले आहे. असे का होत आहे? माझ्या मते हा निर्णय अतिशय चुकीचा आहे. ज्या इतर प्रशिक्षकांची शिफारस करण्यात आली आहे, त्यांचे योगदान आणि गुण माझ्या प्रशिक्षकांपेक्षा कमी आहे. मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच अनिल सरांसोबत सराव करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी इतकी पदके मिळवली आहेत. द्रोणाचार्य पुरस्कार मिळण्याचे दोन निकष आहेत. एक म्हणजे प्रशिक्षकाची कामगिरी आणि दुसरे म्हणजे त्याच्या शिष्याची कामगिरी. मी चांगली कामगिरी करत आहे आणि माझ्या या यशाचे श्रेय माझ्या प्रशिक्षकांना जाते. माझ्या प्रशिक्षकांना जो आदर मिळायला हवा, तो मिळत नाही, असे पंघाल म्हणाला. पंघालची भारतीय बॉक्सिंग महासंघाने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -