‘अॅशेस’मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियाचीच बाजी!

अॅशेस करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने बाजी मारत २-१ ने आघाडी घेतली आहे.

Manchester
eng vs aus 4th test the ashes 2019: Australia beat England by 185 runs
'अॅशेस'मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियाचीच बाजी!

ऑस्ट्रेलियाने ‘अॅशेस’ मालिका क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा पराभव करुन २-१ ने आघाडी घेतली आहे. रविवारी या सामन्याची सांगता झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इग्लंडला १८५ धावांवर धूळ चारुन सामना खिशात घातला. ऑस्ट्रेलियाच्या या यशामागे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हॅजलवूड या गोलादाजांची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इग्लंडच्या नाकेनऊ आले. अखेर १९७ धावांवर इग्लंडचा संपूर्ण संघ तंबूत परतला.


हेही वाचा – पाकिस्तान विरुद्ध भारत विजयी


 

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ बाद ४९७ धावा करुन डाव घोषित केला होता. मात्र, इग्लंडचा संघ पहिल्या डावात फक्त ३०१ धावा करु शकला. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ६ बाद १८६ धावा करुन डाव घोषित केला. मात्र, दुसऱ्या डाव्यातही इग्लंडला साजेशी कामगिरी करता आली नाही. इंग्लंडची दुसऱ्या डावाची सुरुवातच खराब झाली. त्यामुळे अवघ्या १८ धावांवर इग्लंडचे २ विकट्स पडल्या. त्यानंतर रविवारी खेळताना जेसन रॉय आणि जो डेन्ली यांनी सावधपणे सुरुवात करत तिसऱ्या विकेटसाठीसाठी ६६ धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडण्यात ऑस्ट्रेलियाचा कुशल गोलंदाज पॅट कमिन्सला यश आले. कमिन्सने रॉयचा त्रिफळा उडवला. त्यामुळे अवघ्या ३१ धावा करुन रॉयला तंबूत परतावे लागले. त्यानंतर कमिन्सने बेन स्टोक्सला धूळ चारली. बेन स्टोक्स फक्त एक धाव काढू शकला. त्यानंतर कमिन्सच्या गोलंदाजीपुढे नमून तोही तंबूत परतला. तर दुसरीकडे डेन्लीने आपले अर्धशतक पटकावले. मात्र, ५३ धावा करुन तोही तंबूत परतला.


हेही वाचा – अमेरिकन खुली स्पर्धा: स्पेनच्या नदालने पटकावले जेतेपद


 

अवघ्या शंभर धावांच्या आत इंग्लंडचे ५ गडी तंबूत गेले. मात्र तरीही जॉनी बेअरस्टो आणि जोस बटलर खेळत अल्यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांच्या विजयाच्या आशा होत्या. मात्र मिचेल स्टार्कने ही जोडी फोडली. मिचेलने बेअरस्टोला पायचित पकडून बाद केले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. या विकेटनंतर इग्लंडच्या चाहत्यांच्या विजयाच्या आशा मावळल्या. अखेर १९७ धावांवर इंग्लंडचे सर्व गडी तंबूत परतले. त्यामुळे अॅशेस करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा एकदा जिंकला!