घरक्रीडा'हा' संघ तब्बल १६ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार

‘हा’ संघ तब्बल १६ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार

Subscribe

इंग्लंड तब्बल १६ वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा करणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बुधवारी याची माहिती दिली आहे. इंग्लंडचा संघ ऑक्टोबर २०२१ मध्ये पाकिस्तानला जाणार आहे. इंग्लंडचा संघ १२ ऑक्टोबरला कराची येथे दाखल होईल आणि मालिका संपल्यानंतर दोन्ही संघ १६ ऑक्टोबरला आयसीसी पुरुष टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात रवाना होणार आहे.

जानेवारी २०२१ मध्ये छोट्या दौर्‍यासाठी पीसीबीने आमंत्रण दिल्यानंतर ईसीबीने मंगळवारी संध्याकाळी या दौर्‍याबाबत सहमती दिली. १४ आणि १५ ऑक्टोबर २०२१ रोजी कराची येथे यजमान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. २००५ मध्ये इंग्लंडने तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळले होते. दोन्ही संघांमधील मालिका २०१२ आणि २०१५ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळली गेली होती.

- Advertisement -

ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन म्हणाले की, “इंग्लंडचा संघ ऑक्टोबर २०२१ मध्ये पाकिस्तानात खेळेल आणि हीच टीम भारतात टी-२० विश्वचषक खेळेल. २००५ नंतर प्रथमच इंग्लंड पाकिस्तानमध्ये खेळणार आहे.” तर पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान म्हणाले की, “मला सांगायला खूप आनंद होत आहे की, इंग्लंडचा संघ ऑक्टोबर २०२१ मध्ये दोन टी-२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. १६ वर्षानंतर हा पाकिस्तानचा पहिला दौरा असेल, जे कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी दरवाजा उघडेल.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -