घरक्रीडाइंग्लिश प्रीमियर लीग : मँचेस्टर सिटीची बर्नलीवर मात

इंग्लिश प्रीमियर लीग : मँचेस्टर सिटीची बर्नलीवर मात

Subscribe

स्ट्रायकर गॅब्रियल जेसूसने केलेल्या दोन गोलच्या जोरावर गतविजेत्या मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात बर्नली संघावर ४-१ अशी मात केली. हा सामना बर्नलीच्या मैदानावर झाला. सामना सुरु होण्याआधी मँचेस्टर सिटीच्या ड्रेसिंग रुममधील वीज गेली होती, पण याचा त्यांच्या खेळावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी सहजरित्या यंदाच्या मोसमातील आपला दहावा विजय प्राप्त केला. त्यामुळे १५ सामन्यांनंतर सिटीचे ३२ गुण झाले असून ते गुणतक्त्यात दुसर्‍या स्थानी आहेत. गुणतक्त्यात अव्वल स्थानी असणार्‍या लिव्हरपूलचे १४ सामन्यांनंतर ४० गुण आहेत.

बर्नलीविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीपासूनच मँचेस्टर सिटीने आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना २४ व्या मिनिटाला झाला. डेविड सिल्वाच्या पासवर गॅब्रियल जेसूसने अप्रतिम गोल करत मँचेस्टर सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. काही मिनिटांनंतर केविन डी ब्रूनच्या उत्कृष्ट पासमुळे रहीम स्टर्लिंगला गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, त्याने मारलेला फटका बर्नली गोलरक्षक निक पोपने अडवला. त्यामुळे मध्यंतराला सिटीकडे एकाच गोलची आघाडी होती.

- Advertisement -

मध्यंतरानंतर सिटीला गोलसाठी फार वाट पाहावी लागली नाही. ५० व्या मिनिटाला बर्नार्डो सिल्वाच्या पासवर जेसूसने आपला आणि संघाचा दुसरा गोल केला. त्यानंतरही त्यांनी आक्रमक खेळ सुरु ठेवला. ६८ व्या मिनिटाला रॉड्रीने केलेल्या अप्रतिम गोलमुळे सिटीला ३-० अशी आघाडी मिळाली. पुढे बर्नलीने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना गोल करण्याच्या संधी निर्माण करता आली नाही. दुसरीकडे ८७ व्या मिनिटाला रियाद महारेजने सिटीचा चौथा गोल केला. अखेर ८९ व्या मिनिटाला बर्नलीला आपले गोलचे खाते उघडण्यात यश आले. त्यांचा हा गोल रॉबी ब्रेडीने केला. यानंतर दोन्ही संघांना गोल करता न आल्याने मँचेस्टर सिटीने हा सामना ४-१ असा जिंकला.

क्रिस्टल पॅलेस विजयी

- Advertisement -

जेफ्री श्लोपच्या गोलमुळे क्रिस्टल पॅलेस संघाने बॉर्नमथवर १-० असा निसटता विजय मिळवला. या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यातच ममदू साखोला १९ व्या मिनिटाला रेड कार्ड मिळाल्याने पॅलेसला उर्वरित सामन्यात १० खेळाडूंनिशी खेळावे लागले. मात्र, त्यांनी उत्तरार्धात दमदार खेळ करत हा सामना १-० असा जिंकला. बॉर्नमथचा प्रीमियर लीगमधील हा सलग चौथा पराभव होता, तर पॅलेसचा हा १५ सामन्यांतील सहावा विजय होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -